कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 09:58 AM2020-09-05T09:58:21+5:302020-09-05T10:15:28+5:30
अध्ययन असंही म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत इतका मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालाय. पण हे सगळं फार पूर्वीपासून सुरू आहे.
एम.एक्स प्लेअरच्या 'आश्रम' या वेबसीरीजमध्ये गायकाची भूमिका साकारणाऱ्या अध्ययन सुमनने मीडियासोबत बोलताना एक्स गर्लफ्रेन्ड कंगना रनौतच्या ड्रगबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तो म्हणाला की, त्याने त्याच्यासमोर काही लोकांना ड्रग्स घेताना पाहिलंय. अध्ययन असंही म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत इतका मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालाय. पण हे सगळं फार पूर्वीपासून सुरू आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने सांगितले की, 'मी माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये काही मोठ्या पार्टीजमध्ये गेलो होतो. तिथे मी मोठ्या कलाकारांनी ड्रग्स घेताना पाहिलं होतं. असं म्हणणं चुकीचं ठरेल की, पूर्ण बॉलिवूड असं करतं. इंडस्ट्रीतील काही हाय-प्रोफाइल लोक असे आहेत जे ड्रग्स घेतात. हे फार दुख:द आहे. मी अशा लोकांच्या ग्रुपचं भाग होणं स्वीकारलं नाही आणि ना ड्रग्सचा स्वीकार केला'.
अध्ययन म्हणाला की, ड्रग्स केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत लिमिटेड नाही. तसेच बॉलिवूडमध्ये ९९ लोक ड्रग्स अॅडिक्ट आहेत या कंगनाच्या वक्तव्यावरही अध्ययन बोलला. कंगनाच्या या वक्तव्यावर फार जास्त टीका होत आहे. पण अध्ययनने कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रतिक्रिया देणं टाळलं. तो म्हणाला की, कंगना फार मोठी स्टार आहे आणि मी एक छोटा कलाकार आहे. मला तिच्या वक्तव्यावर काही बोलायचं नाही. हेच माझ्यासाठी चांगलं आहे. जर मी तिच्याबाबत काही बोललो तर ते चुकीचं ठरेल. ती मोठी स्टार आहे तिला खूप काही माहीत आहे. त्यामुळे मी गप्प राहणं योग्य समजेन'.
हे पण वाचा :
पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल
मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर...
मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले