‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!

By रूपाली मुधोळकर | Published: October 9, 2020 02:56 PM2020-10-09T14:56:58+5:302020-10-09T15:08:12+5:30

जाणून घ्या काय आहे भानगड

akshay kumars film laxmmi bomb trailer gets good response but audience doesnt like this strategy | ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!

‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर आज रिलीज झाला. एकीकडे हा ट्रेलर पाहून चाहते पुन्हा एकदा अक्कीच्या प्रेमात पडले आहेत. पण  काही लोकांना मात्र ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलरने नाराज केले आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी अक्षयला ‘डरपोक’ म्हणत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. अक्षय व चित्रपटाचा दिग्दर्शक दोघेही ट्रोल होत आहेत.

काय आहे भानगड?
‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरमध्ये असे काय आहे की, लोक नाराज झालेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे कारण आहे मेकर्सचा नवा फंडा. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्री लोकांच्या आधीच निशाण्यावर आहे. गेल्या काही दिवसांत नवा ट्रेलर रिलीज होताच त्याला लाईक्स ऐवजी डिसलाईक्स मिळत आहेत. अलीकडे आलिया भटचा ‘सडक 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला, त्यावेळी हेच चित्र दिसले होते. लोकांनी या ट्रेलरवर डिसलाईक्सचा भडीमार केला होता. या नकारात्मक प्रतिसादातून बॉलिवूडबद्दलचा लोकांचा संताप व्यक्त झाला होता. अशात अक्षय व ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या मेकर्सनी यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करावे तर युट्यूबवर लाइक-डिसलाईकचे आॅप्शनच ‘प्रायव्हेट’ केले. यामुळे या ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स लोक बघू शकले नाहीत. याच कारणामुळे अनेकांनी अक्षय व ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या मेकर्सला ट्रोल करणे सुरु केले. भित्रे, डरपोक अशा काय काय प्रतिक्रिया लोक देत आहेत.
या प्रतिक्रिया तुम्ही खाली पाहू शकता.

कसा आहे ट्रेलर?

ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथेचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की, ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, ''ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल, त्या दिवशी मी बांगड्या घालेन.'' त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाज पाहायला मिळतो.

मुलींप्रमाणे देहबोली असणे, मुलींप्रमाणेच हावभाव करत बोलणे अशा अंदाजाl अक्षय कुमार दिसतो. अक्षय कुमार त्याची मैत्रिण कियारा अडवाणीच्या आई वडिलांसोबत राहतो. या घरातच भूतांचा वास असल्याचे जाणवू लागते. ट्रेलरमधील अक्षयचे काही सीन इतके धडकी भरवणारे आहेत. काही क्षण तुमचाही थरकाप नाही उडाला तर नवलच.

भारतात नाही तर 'या' देशांमधील सिनेमागृहात  'लक्ष्मी बॉम्ब' होणार रिलीज

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत. अक्षय कुमार या सिनेमातून पहिल्यांदाच एका किन्नरची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे.  

हो, आम्हाला शांती हवी, ‘लक्ष्मी बॉम्ब’ नकोच...! अक्षय कुमारचा सिनेमा बॅन करण्याची मागणी

Web Title: akshay kumars film laxmmi bomb trailer gets good response but audience doesnt like this strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.