'दीवार' मध्ये छोटा अमिताभ साकारणारा हा लहान मुलगा आता कुठे आहे, काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:34 PM2022-07-11T16:34:41+5:302022-07-11T16:36:23+5:30

Alankar Joshi : अलंकार जोशी आयटी सेक्टरमध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. अनेकांना माहीत नाही पण 'काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पल्लवी जोशीचा भाऊ अंलकार जोशी आहे.

Alankar joshi played role in Deewar and sholay is in IT sector | 'दीवार' मध्ये छोटा अमिताभ साकारणारा हा लहान मुलगा आता कुठे आहे, काय करतो?

'दीवार' मध्ये छोटा अमिताभ साकारणारा हा लहान मुलगा आता कुठे आहे, काय करतो?

googlenewsNext

Child Actor Alankar Joshi: अलंकार जोशी आपल्या अभिनय कौशल्यामुळे त्यावेळी फिल्म मेकर्सची पहिली पसंत बनला होता. या चाइल्ड आर्टिस्टने 'दीवार' सोबतच त्यावेळच्या अनेक सिनेमात काम केलं होतं. अलंकार जोशीने ड्रीम गर्ल, सीता और गीता, शोले सारख्या हिट सिनेमात भूमिका केल्या होत्या. पण खूप आधीच अलंकार जोशीने अभिनय सोडून आयटी सेक्टरमध्ये आपलं करिअर करण्याचा विचार केला. तुम्ही वाचून हैराण व्हाल की, दीवार सिनेमात अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणारा हा चाइल्ड आर्टीस्ट आता आपल्या परिवारासोबत अमेरिकेत राहतो.

अलंकार जोशी आयटी सेक्टरमध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. अनेकांना माहीत नाही पण 'काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पल्लवी जोशीचा भाऊ अंलकार जोशी आहे. पल्लवी जोशीही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. दोघेही चांगलेच प्रसिद्ध आहेत.

अलंकार जोशीला तीन मुलं आहेत. एक मुलगा आणि दोन मुली. एक मुलगी रूझानही अभिनयात आहे. रूझानही हेलो मिनी वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे. तसेच अनुजा जोशी ही दुसरी मुलगीही इंडस्ट्रीत फेमस आहे. असे अनेक कलाकार  लाइमलाइटमधून अचानक गायब होतात आणि आपलं एक वेगळं विश्व सुरू करतात.

अलंकार जोशीला 90च्या दशकात काम मिळणं कमी झालं होतं. ज्यामुळे त्याने अभिनय सोडून दुसरं काही करण्याचा विचार केला. असे अनेक कलाकार आहेत जे आधी खूप लोकप्रिय झाले आणि त्यांना नंतर काम कमी मिळत गेलं. अशा कलाकारांनी त्यांचा दुसरा मार्ग निवडला त्यातीलच एक म्हणजे अंलकार जोशी आहे. अलंकार आयटी क्षेत्रात मोठ्या जोमाने काम करत आहे. पण त्याने साकारलेल्या अनेक भूमिका आजही चाहत्यांच्या मनात आहेत.
 

Web Title: Alankar joshi played role in Deewar and sholay is in IT sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.