“आमच्या व्हॅनवर ते दगड मारायला...”, अमिषा पटेलने सांगितला ‘गदर २’च्या शूटिंगचा ‘तो’ प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:53 IST2023-07-27T14:52:13+5:302023-07-27T14:53:20+5:30
"आमच्या व्हॅनचे दरवाजे त्यांनी...", 'गदर २'च्या शूटिंगदरम्यानचे प्रसंग अमिषा पटेलने केले शेअर

“आमच्या व्हॅनवर ते दगड मारायला...”, अमिषा पटेलने सांगितला ‘गदर २’च्या शूटिंगचा ‘तो’ प्रसंग
सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असलेला ‘गदर’ हा सिनेमा प्रचंड गाजला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता २२ वर्षांनी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गदर २’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या चित्रपटातील कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री अमिषा पटेल हिने शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले.
अमिषा म्हणाली, “आम्ही ‘गदर २’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. शूटिंगसाठी सेटही लागला होता. दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर्सने पूर्ण तयारी केली होती. आम्ही खूप मेहनतही केली होती. त्या दिवशी रात्रीचं शूटिंग होणार होतं. सकाळच्या वेळेत शूटिंग नसूनही चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. ते जायलाही तयार नव्हते. शूटिंग होऊन देणार नाही, असं ते म्हणत होते. त्यांनी आमच्या व्हॅनिटी वॅनचे दरवाजे जोरजोरात वाजवत होते. दिग्दर्शक अनिल शर्मा मला म्हणाले, जर तू बाहेर गेली नाहीस तर ते व्हॅनवर दगडं मारायलाही कमी करणार नाहीत. बाहेर जा, त्यांना हात दाखव आणि हॉटेलवर निघून जा.”
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षयाच्या सासूबाईंना पाहिलंत का? पाठकबाईंनी शेअर केला खास फोटो
“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल
“अमृतसरमध्येही असंच घडलं होतं. सनी पाजी येत आहेत, हे चाहत्यांना माहीत पडलं. तिथे लाठीचार्ज करावा लागला होता. त्यांना लगेच दुसऱ्या विमानाने मुंबईला परतावं लागलं होतं,” असंही अमिषाने सांगितलं. बहुचर्चित ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात तारा सिंह पुन्हा पाकिस्तानात त्याच्या मुलासाठी जाणार आहे. उत्कर्ष शर्माने तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे.