कोरोना अन् ‘कुली’ अपघात... ! अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित हा योगायोग तुमच्या लक्षात आला?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:22 PM2020-08-05T12:22:45+5:302020-08-05T12:25:03+5:30
‘कुली’च्या सेटवरचा तो अपघात आणि कोरोनाची लढाई यात एक जबरदस्त लिंक आहे.
अमिताभ बच्चन यांना अलीकडे कोरोनाची लागण झाली होती. नुकतेच ते बरे होऊन घरी पतरले. अमिताभ यांना कोरोना झाल्याचे समजताच देशविदेशातून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या. ‘कुली’ या सिनेमाच्या सेटवर अमिताभ यांना झालेल्या अपघातानंतरही जगभरातील चाहत्यांनी देवाकडे अशाच प्रार्थना केल्या होत्या. ‘कुली’च्या सेटवरचा तो अपघात आणि कोरोनाची लढाई यात एक जबरदस्त लिंक आहे. याला एक जबरदस्त योगायोग म्हणता येईल.
दोनदा 2 ऑगस्ट ला ठीक झालेत बिग बी
26 जुलै 1982 मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन व पुनीत इस्सर यांच्यात एक फाईट सीन शूट करताना बिग बी यांचा पोटात गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचे बरेच रक्त वाहून गेले होते. अमिताभ यांना गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत अमिताभ धोक्याबाहेर असल्याचे जाहिर केले होते. ती तारीख होती 2 ऑगस्ट . त्यानंतर अमिताभ कोरोना मुक्त होऊन घरी परतले ती तारीखही होती 2 ऑगस्ट .
🙏🏽 my father, thankfully, has tested negative on his latest Covid-19 test and has been discharged from the hospital. He will now be at home and rest. Thank you all for all your prayers and wishes for him. 🙏🏽
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) August 2, 2020
2 ऑगस्टलाच अभिषेक बच्चनने ट्वीट करत अमिताभ कोरोना मुक्त झाल्याची घोषणा केली होती. हा एक योगायोग म्हणता येईल.
कुली अपघातानंतर 2 ऑगस्टला अमिताभ यांना जीवदान मिळाले होते. हा त्यांचा दुसरा जन्म होता. त्यामुळे अमिताभ 2 ऑगस्टला आपला दुसरा वाढदिवस साजरा करतात.