जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 03:57 PM2020-09-16T15:57:22+5:302020-09-16T16:02:02+5:30

पत्नीच्या समर्थनार्थ अमिताभ यांनी एक ट्विट करत, जया यांना ट्रोल करणा-यांना उत्तर दिले आहे.

amitabh bachchan support wife jaya bachchan for her statement in parliament against kangana ranaut and ravi kishan | जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला

जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला

googlenewsNext

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन यावरून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता याच पार्श्वभूमीवर कंगना विरूद्ध जया बच्चन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचे कारस्थान सुरु  असून खाल्ल्या ताटाला भोक पाडण्याचे काम काही लोक करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी राज्यसभेत केला होता. यावर कंगनाने जया बच्चन यांना टोला लगावला होता. आता या वादात बिग बी अमिताभ बच्चन यांनी उडी घेत पत्नी जया बच्चन यांची अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे.
पत्नीच्या समर्थनार्थ अमिताभ यांनी एक ट्विट करत, जया यांना ट्रोल करणा-यांना उत्तर दिले आहे.

काय म्हणाले बिग बी?
जया बच्चन यांच्या समर्थनार्थ अमिताभ यांनी एक शेर शेअर केला आहे.  सध्या जया बच्चन यांना बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्यांना ट्रोल करणा-यांना बिग बींनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरा कहते हैं
देखा है हमने चिरागों से जलने वाले चिरागों को घेरे रहते है,’ असा हा शेर आहे. या पोस्टसोबत त्यांनी काही स्मायलिंग इमोजीही पोस्ट केले आहेत.

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला ट्रोल केले जात आहे. याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला होता. ‘ बॉलिवूडमधील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोलले जातेय.  इंडस्ट्रीत राहून नाव कमावणारेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे,’ असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.
 याआधी अभिनेत्री कंगना राणौतने बॉलिवूडला ‘गटार’ म्हटले होते. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या आहारी गेले असल्याचा दावा तिने केला होता. भाजपा खासदार रवी किशन यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरही जया बच्चन बोलल्या होत्या.  रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच ‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात’, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली होती.


 
जया बच्चन यांना कंगनाचा टोला

जया बच्चन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तो सुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्रधान असलेल्या भूमिकांना सजवते, जयाजी, हे माझे स्वत:चे ताट आहे.

बच्चन कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची सुरक्षा, 'जलसा'बाहेर पोलीस तैनात

बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते, कंगनाचा सनसनाटी गौप्यस्फोट

अमिताभ यांच्या बंगल्यांची सुरक्षा वाढली
अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर बच्चन कुटुंबीयांना सोशल मीडियावर धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने अभिषेक, ऐश्वर्या, जया आणि अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ही सुरक्षा देण्यात आली आहे.
 

Web Title: amitabh bachchan support wife jaya bachchan for her statement in parliament against kangana ranaut and ravi kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.