शाहिद कपूरसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर अमृता रावने तोडली चुप्पी, म्हणाली- आम्ही मित्रदेखील नाही
By तेजल गावडे | Updated: November 2, 2020 20:35 IST2020-11-02T20:34:50+5:302020-11-02T20:35:42+5:30
अमृता रावने शाहिद कपूरसोबतच्या रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे.

शाहिद कपूरसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर अमृता रावने तोडली चुप्पी, म्हणाली- आम्ही मित्रदेखील नाही
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी जवळपास एकत्रच बॉलिवूडमधील कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्या दोघांनी एकानंतर एक बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. ज्यावेळी शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी यशस्वी चित्रपट देत होते त्याचवेळी शाहिद आणि करीना एकमेकांना डेट करत होते. तरीदेखील त्यावेळी मीडियामधील काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला की शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्यामध्ये प्रेम फुलत होते.
शाहिद कपूर आणि अमृता रावने अशा वृत्तांना कधीच दुजोरा दिला नव्हता आणि एकत्र चित्रपट काम करत राहिले. हळूहळू असे वृत्त येणे बंद झाले आणि ते दोघे आप आपापल्या मार्गाने निघून गेले. या वृत्तानंतर जवळपास एक दशकानंतर शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केले. आता त्या दोघांना मीशा आणि जैन नामक दोन मुले आहेत. तर दुसरीकडे अमृता रावने आरजे अनमोलसोबत लग्न केले आणि नुकतेच दोघे आई वडील बनणार आहे.
अमृता रावने आई बनल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बातचीत केली आणि शाहिद कपूरसोबतच्या लिंकअपच्या वृत्ताबद्दल खुलासा केला आहे. अमृता रावने दावा केला आहे की भलेही तिचे आणि शाहिदच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ते दोघे खूप चांगले मित्र देखील नव्हते.
अमृता रावनुसार, जेव्हा शाहिद कपूर आणि माझ्याबद्दल अफवा सुरू होत्या त्यावेळी आम्ही दोघे चांगले फ्रेंड्सदेखील नव्हतो. आम्ही दोघे एकमेकांना फक्त ओळखत होतो. याशिवाय आमच्यात काहीच नव्हते. आम्ही दोघे आजही एकमेकांचा खूप आदर करतो. जेव्हा मी शाहिदसोबत चित्रपटात काम करत होते तेव्हा तो एका नात्यात होता.
आमच्या चाहत्यांना वाटत होते की आम्ही रियल लाइफमधील कपल व्हावे. कलाकार म्हणून आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो पण आमच्यात तसे काहीच नव्हते.