अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 18:11 IST2020-08-23T18:10:16+5:302020-08-23T18:11:27+5:30

स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये मिळणारे प्राधान्य आणि आऊटसायडर्सना डावलले जाणे या मुद्यावरून चांगलेच थैमान माजले आहे. त्यामुळे अभिनेता अंगद बेदीने एक अत्यंत वेगळी इच्छा व्यक्त केली आहे.

Angad Bedi expressed ‘this’ desire; Say, ‘My daughter should be‘ as capable as an actress ’!! | अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिजम या विषयावरून चांगलीच खळबळ माजली आहे. स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये मिळणारे प्राधान्य आणि आऊटसायडर्सना डावलले जाणे या मुद्यावरून चांगलेच थैमान माजले आहे. त्यामुळे अभिनेता अंगद बेदीने एक अत्यंत वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांची मुलगी मेहेर हिने स्वत:च्या कर्तृत्वावर सिद्ध करावे आणि तिला हव्या त्या क्षेत्रात तिने करिअर करावे, असे त्याने म्हटले आहे. दीपिका पादुकोणने जसा तिच्या करिअरसाठी लढा दिला त्याप्रमाणे स्वत:च्या हिमतीवर माझ्याही लेकीने स्वत:ला सिद्ध करावे, असे अंगद बेदीने म्हटले आहे.

बऱ्याच वेळा कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. यात सैफ-करीनाचा मुलगा तैमुर, तुषार कपूरचा मुलगा, करण जोहरची मुलं हे कायमच चर्चेत असतात. मात्र यावेळी अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांची लेक मेहेर चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे अंगदने केलेल्या एका वक्तव्यामुळे मेहेरची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. मेहेरने अभिनेत्री दीपिका पदुकोण, गुंजन सक्सेना अशा यशस्वी स्त्रियांकडून प्रेरणा घ्यावी असं अंगदला वाटतं. यामागील कारण देखील त्याने या मुलाखतीत सांगिलं. ‘दीपिका पदुकोण, सानिया मिर्झा, गुंजन सक्सेना, दुतीचंद, सायना नेहवाल अशा अनेक यशस्वी स्त्रिया आहेत, ज्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. या प्रत्येक स्त्रीने स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे माझ्या मुलीने या सगळ्या स्त्रियांकडून प्रेरणा घ्यावी’, असं अंगद म्हणाला. 

पुढे तो म्हणतो, ‘मेहेरने तिला हव्या त्या क्षेत्रात करिअर करावं. मात्र ज्या क्षेत्रात ती करिअर करेल त्यात तिने उत्कृष्ट कामगिरी करावी.’ दरम्यान, अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनी दीड वर्षांची मुलगी आहे. मेहेर असं तिचं नाव असून अनेक वेळा नेहा आणि अंगद आपल्या बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Web Title: Angad Bedi expressed ‘this’ desire; Say, ‘My daughter should be‘ as capable as an actress ’!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.