अंकिताच्या निम्म्या फ्लॅटवर सुशांतच्या कुटुंबीयांचाही हक्क, करू शकतात कब्जा; जाणून घ्या नेमकं प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 05:10 PM2020-08-26T17:10:37+5:302020-08-26T17:13:24+5:30
ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. चौकशीदरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. ही बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. मात्र यानंतर अंकिताने यावर प्रतिक्रिया दिली.
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर आपल्या बँक अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला कट होणाऱ्या फ्लॅट पेपरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला फ्लॅटचा EMI कट होत असल्याचं देखील म्हटलं आहे. मात्र याबाबत आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. अंकिताच्या निम्म्या फ्लॅटवर आता सुशांतचे कुटुंबीय देखील कायदेशीर हक्क सांगू शकतात तसेच कधीही कब्जा करू शकतात अशी माहिती मिळत आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वी फ्लॅट संदर्भातील काही फोटो शेअर करून मी सर्व तर्क-विर्तकांना विराम देते असं म्हटलं आहे.
अंकिताने "हे माझ्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आहे, 1 जानेवारी 2019 ते 1 मार्च 2020 या कालावधीतील माझ्या बँक अकाऊंट्सची पूर्ण डिटेल्स. माझ्या बँकेच्या अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला फ्लॅटचा EMI कट होतो. ज्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकतं नाही" असं सांगितलं आहे. तर सुशांत त्याच्या फ्लॅटचा EMI स्वत: भरत होता. मात्र अंकिताने ब्रेकअपनंतरही हे घर सोडलं नाही. तसेच ती आपल्या आणि सुशांतच्या हिस्स्यामध्ये अद्यापही राहत आहे. मात्र यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सुशांत आणि अंकिता या दोघांच्या नावावर दोन वेगवेगळे फ्लॅट्स रजिस्टर्ड आहेत. मात्र हे दोन्ही फ्लॅट एकमेकांना जोडलेले आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर आताही अंकिता त्याच फ्लॅटमध्ये राहते. मात्र कायद्याने हा फ्लॅट सुशांतचा देखील आहे. कारण अंकिता आणि सुशांतचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे आता सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याचा हिस्सा असलेल्या फ्लॅटवर हक्क सांगू शकतात. मालाडच्या पश्चिमेला इंटरफेस हाईट्सममध्ये हे दोन्ही फ्लॅट आहेत.
सुशांत आणि अंकिताने 2013 मध्ये गुप्ता कुटुंबाकडून हे फ्लॅट्स घेतले होते. रजिस्ट्रेशननुसार सुशांतने प्रशांत गुप्ता आणि मानसी गुप्ता यांच्याकडून 10 मे 2013 ला फ्लॅट खरेदा केला. तर अंकिताने सावित्री देवी गुप्ता यांच्याकडून फ्लॅट खरेदी केला. मात्र हे एकच कुटुंब आहे. दोन्ही फ्लॅटचं रजिस्ट्रेशन वेगवेगळं आहे पण हे फ्लॅट्स एकमेकांना जोडलेले आहेत. दोन्ही फ्लॅट्स 683 स्क्वेअर फूटचे आहेत.
2016 मध्ये सुशांत आणि अंकिताचं ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतने हे घर सोडलं. मात्र तेव्हापासून अंकिता याच फ्लॅटमध्ये राहत आहे. त्यामुळे सुशांतचा देखील यामध्ये हिस्सा असून अंकिता राहत असलेल्या निम्म्या फ्लॅटवर त्याचे कुटुंबीय कायदेशीर हक्क सांगू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाले आहेत. सुशांतच्या आठवणीत भावूक झालेल्या अंकिताने एक पोस्ट शेअर करत ''तुला जाऊन आज 2 महिने झाले सुशांत आणि मला माहिती आहे तू आता जिथे असशील तिथे आनंदी असशील'' असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : पोस्टमन ठरला व्हायरसचा 'सुपर स्प्रेडर', एकाच गावातील 100 जणांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा
माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार
काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग
मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'