जुही बब्बरच्या प्रेमात पडल्याने अनुप सोनीने दिला होता पत्नीला घटस्फोट, पाहा त्याच्या पहिल्या पत्नीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 08:00 PM2019-07-07T20:00:00+5:302019-07-07T20:00:02+5:30
अनुप सोनी हा अभिनेते राज बब्बर यांचा जावई असून तो अनेकवेळा त्याची पत्नी जुही बब्बरसोबत सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतो.
अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो परतणार आहे. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अनुप सोनी हा अभिनेते राज बब्बर यांचा जावई असून तो अनेकवेळा त्याची पत्नी जुही बब्बरसोबत सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जुही बब्बर ही अनुप सोनीची दुसरी पत्नी आहे. अनुपचे जुहीसोबत लग्न व्हायच्या आधी एक लग्न झालेले होते आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. अनुप सोनीचे पहिले लग्न रितू सोनीसोबत झाले होते. रितू पुण्यातील सिम्बोयसिस कॉलेजमध्ये शिकली असून तिची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्या दोघांना झोया आणि मायरा अशी दोन मुले आहेत.
लग्नाच्या सहा वर्षांनंतर अनुप खूप बदलला असल्याचे रितूच्या लक्षात आले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनुप खूप बदलला असून यासाठी जुही बब्बर जबाबदार आहे असे रितूच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याचे मोबाईल बिल तपासले. त्यात अनुप दिवसातील जास्तीत जास्त वेळ जुहीसोबत बोलत असल्याचे रितूच्या लक्षात आले. त्यावर रितूने जुहीला विचारले असता तिने त्यांच्यात केवळ फोनवर बोलणे होते. त्याशिवाय त्यांच्यात काहीही नाही असे सांगितले होते. पण काही दिवसांनी अनुपनेच त्याच्या आणि जुहीच्या नात्याविषयी कबुली दिली. त्यानंतर रितू आणि त्याने मार्च 2010 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर माझ्या मुलीच माझ्यासाठी प्रायोरिटी आहेत असे रितूने सांगितले होते.
रितूसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनुपने 2011 मध्ये जुहीसोबत लग्न केले. हे जुहीचे देखील दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न लेखक बिजॉय नाम्बियार यांच्यासोबत झाले होते. अनुप आणि जुही यांना आता एक मुलगा असून त्याचे नाव इमान आहे.