त्याला सर्व माहित होतं...! अनुराग कश्यपप्रकरणात पायल घोषनं घेतलं इरफान पठानचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 10:17 AM2020-10-18T10:17:06+5:302020-10-18T10:19:08+5:30
वाचा, काय म्हणाली पायल
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने आता या प्रकरणात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचे नाव घेतले आहे. अनुरागने केलेल्या गैरकृत्याबद्दल इरफान पठाणला मी सांगितले होते. पण आता तो या प्रकरणावर चकार शब्द बोलायला तयार नाही, असा दावा पायलने केला आहे.
2014 मध्ये अनुरागने घरी बोलवून गैरवर्तन केल्याचा पायलचा आरोप आहे. याप्रकरणी अनुरागविरोधात तिने एफआयआर दाखल केला आहे. आता पायलने एक ट्वीट करत याप्रकरणात इरफान पठाणच्या नावाचा उल्लेख केला आहे.
I have definitely not talked about mr. kashyap raped me but I shared everything with @IrfanPathan about the conversations including (xyz) alas!! he is keeping mum inspite of knowing everything and once he claimed to be my good friend.
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 17, 2020
‘ अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केल्याचे मी इरफान पठानला सांगितले नव्हते. मात्र अनुरागप्रकरणाबद्दल मी इरफानला खूप काही सांगितले होते. आता मात्र तो गप्प आहे. चांगला मित्र असल्याचा दावा तो करतो,’ असे पायलने म्हटले आहे.
The point of tagging @IrfanPathan doesn’t mean I have any interest in him but he’s the one I have shared everything about Mr. Kashyap but not d rape thing.. I know he believe in his faith and his elderly parents so I expect him to talk about whatever I shared wd him. pic.twitter.com/hMwNklY4r9
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 17, 2020
‘इरफान पठाणला टॅग करण्याचा अर्थ हा नाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी त्याच्यासोबत रेपसोडून बाकी सर्व काही शेअर केले होते. या सगळ्या गोष्टी ज्या मी त्याला सांगितल्या, त्या तो सांगेल, असा मला विश्वास आहे,’ असे एका ट्वीटमध्ये तिने लिहिले आहे.
पायलचा मोठा खुलासा
2014 a day prior to Holi AK msg me ,was asking me 2 b 2his place dt time @IrfanPathan was at my home only,d msg came infront of him & I told him I’m going to go 2 @vineetjaintimes ‘s party but not 2 mr. Kashyap’s house. Hope he remembers.!! https://t.co/m7jZD8Lqen
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 17, 2020
2014 चा एक किस्साही तिने सांगितला आहे. ती लिहिते, ‘2014 मध्ये होळीच्या एक दिवस आधी अनुरागने मला मॅसेज केला होता. मी त्याच्या घरी यावे, अशी त्याची इच्छा होती. त्यावेळी इरफान माझ्याच घरी होता. त्याच्याच समोर अनुरागचा मॅसेज आला होता. मात्र मी इरफानला मी विनीत जैनच्या घरी जातेय, असे सांगितले होते. आशा आहे, त्याला आठवत असेल.’
A little bit of details and truth hurt nobody. Let the culprit come and refute it and let's find out the truth. . If this doesn't ignite the woman in you and the human in you craving for justice, don't know what will. #FightTillTheEnd pic.twitter.com/n6Ki4Et15l
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 14, 2020
पायलने सांगितले त्या दिवसाची घटना
अलीकडे पायलने एक व्हिडीओ शेअर केला होता. पायलने या व्हिडीओत सांगितले की, 'मी मिस्टर कश्यपला फेसबुकच्या माध्यमातून ओळखत होते. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवले होते. मी गेले होते. त्यांनी मला घरी बोलवले मी तिथेही गेले. आमच्यात बोलणं झाले. जेवण केले आणि मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवले. तेव्हा ते ड्रिंक आणि स्मोक करत होते. वेगळाच वास येत होता. मला उलटीसारखं होत होते. मी विचारले सर हे काय आहे. तर त्यांनी सांगितले गांजा. मग ते मला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेले. पायलने सांगितले की, अनुरागने कपडे काढले आणि जबरदस्ती करू लागले. जेव्हा मी नाही म्हणत होते तर त्यांनी XYZ ची नावे घेतली आणि ४००, ५०० मुलींची नावे घेऊन मला कन्विंस करू लागले. पायल म्हणाली की, ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते.
पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली
'एकटी लढत राहीन, पण सोडणार नाही'
त्यानंतर पायल म्हणाली की, जे काही झाले त्या विरोधात मी लढत आहे. मी एकटीच लढत आहे. कारण कुणीही साथ देत नाहीय. इथे सगळे फेक लोक भरलेले आहेत. पण मी कुणालाही सोडणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढत राहीन. जे लोक माझ्यासोबत उभे आहेत आणि सपोर्ट करत आहे त्यांचे आभार.