‘या’ अभिनेत्याने स्वत:ला संबोधले बॉलिवूडमधील एलियन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 03:36 PM2018-05-24T15:36:22+5:302018-05-24T21:06:28+5:30
आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाºया अभिनेता डॅनी डेंगजोंगप्पा यांनी त्यांच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. ...
आ ल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाºया अभिनेता डॅनी डेंगजोंगप्पा यांनी त्यांच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या मते, ‘बॉलिवूडमध्ये ते एखाद्या एलियनप्रमाणे आहेत. देशातील सर्वांत सुंदर सिक्किम या राज्यातून असलेल्या डॅनी यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान मिळविले. ते हिंदी चित्रपटांमध्ये १९७१ पासून सक्रिय आहेत. वयाच्या ७०व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये आपली अदाकारी दाखवित आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांची कथा असलेल्या ‘काबुलीवाला’वर आधारित असलेला डॅनी यांचा ‘बायस्कोपवाला’ या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहेत.
याविषयी डॅनी यांनी सांगितले की, ‘मी फिल्म इंडस्ट्रीत एखाद्या एलियनप्रमाणे आहे. कारण मी सिक्किममधून आलो आहे. चित्रपट क्षेत्रात असतानाही मी कधी फिल्मी व्यक्तीप्रमाणे राहिलो नाही. मी वेगळा राहून केवळ माझे काम करीत गेलो. डॅनी यांना सिक्किमबद्दल विशेष ओढ आहे. कारण जेव्हा ते चित्रपटांची शूटिंग करीत नसतात तेव्हा ते आपल्या फार्महाउसमध्ये वेळ व्यतित करणे पसंत करतात. याविषयी त्यांनी सांगितले की, ‘एकाच पद्धतीचे काम करणे मला त्रासदायक वाटते. त्यामुळे कामात विविधता यावी म्हणून मी, पेंटिंग, नक्षीकाम आणि गाणी लिहिणे व गाण्याचा प्रयत्न करीत असतो. मी कधीही कुठल्या प्रकारची योजना आखत नाही. जेव्हा मला असे वाटले की, आता अभिनय करू नये तेव्हा मी अशाप्रकारचे काम करीत असतो.
पुढे बोलताना डॅनी यांनी म्हटले की, मी माझ्या मुलाला म्हणत असतो की, जेव्हा मी पुणे फिल्म इन्स्टिट्यूट येथून मुंबईला आलो होतो तेव्हा माझ्या खिशात केवळ पंधराशे रूपये होते. जर आज मी सर्व काही गमावून बसलो तर माझ्या पायातील जोड्याची किंमत यापेक्षा अधिक असेल. याचे श्रेय मी, प्रेक्षक, शिक्षक आणि बौद्ध धर्माला देतो. यास आज लोक धर्म म्हणतात, परंतु वास्तवमध्ये ते दर्शन आहे. मी माझ्या कामात शांतता शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. मी कधीच वस्तूंच्या मागे पळत नाही. मला खरोखरच आश्चर्य वाटते की, माझा धर्म, भाषा आणि वेगळे रूप असतानाही लोकांनी मला स्वीकारले, असेही डॅनी यांनी म्हटले.