"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By Ravalnath.patil | Published: September 24, 2020 12:42 PM2020-09-24T12:42:25+5:302020-09-24T12:49:40+5:30
मुंबई पालिकेच्या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली असून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई पालिकेवर टीका करत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे.
बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे.
यासंदर्भात कंगनाने ट्विट केले आहे. ती म्हणाली, "उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझे घर बेकायदेशीर पद्धतीने तोडत होते. त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज हे जवळपास ५० लोक जिवंत असते. एवढे जवान तर पुलवामा, पाकिस्तानमध्ये मारले नाहीत, तेवढे आपल्या निष्काळजीमुळे मरण पावले. मुंबईचे काय होईल देवाला ठाऊक?"
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. तसेच, मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्यप्त काश्मीर) केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. यावरून कंगना विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडले आहे.
मुंबई पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली असून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई पालिकेवर टीका करत आहे. याआधीही कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी "उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझे घर तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझा गर्व तुटेल," अशी टीका कंगनाने केली होती.
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracypic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा
भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी १४, दुसऱ्या दिवशी १२ तर तिस-या दिवशी बुधवारी सर्वाधिक १५ मृतदेह हाती लागले आहेत. ६० तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे.
आणखी बातम्या..
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
- बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी