सावळा रंग अन् वाढलेलं वजन; सौंदर्यांची खाण असलेल्या रेखाला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:35 PM2023-04-27T16:35:47+5:302023-04-27T16:38:10+5:30
Rekha: 'मी स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर..'; असं म्हणत रेखा यांनी त्यांचा अनुभव शेअर केला.
निखळ सौंदर्य म्हणजे काय? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तरं रेखा (rekha) असं असेल. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचं सौंदर्य, तारुण्य वयाच्या ६६ व्या वर्षीही तितकंच खुललेलं आहे. त्यामुळे आजही नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा रंगते. प्रोफेशन,पर्सनल अशा कितीतरी गोष्टींमुळे चर्चेत आलेल्या रेखा यांना कधीकाळी त्यांच्या याच दिसण्यावरुन ट्रोलही केलं होतं. इतंकच काय तर त्यांना बॉडीशेमिंगसारख्या गोष्टीला सामोरं जावं लागलं होतं.
रेखा यांना सुरुवातीच्या काळात वाढलेल्या वजनामुळे आणि सावळ्या रंगामुळे अनेकांना ट्रोल केलं. येता-जाता त्यांची खिल्ली उडवली. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. सिमी ग्रेवाल यांच्या 'Rendezvous with Simi Garewal ' या टॉक शोमध्ये त्यांनी त्यांच्या बॉडी शेमिंगविषयी खुलासा केला.
"सुरुवातीच्या काळात माझ्या दिसण्यावरुन अनेकांनी मला टोमणे मारले. माझं वजन, सावळा रंग यावरुन अनेकांनी माझी खिल्ली उडवली. पण, मी स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर माझ्यात झालेला बदल तुमच्यासमोर आहे", असं रेखा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "कधी कधी मी सतत पॉपकॉर्न खायचे. चॉकलेटची सवय मोडायला तर मला अडीच वर्ष लागले. 1998 मध्ये 'घर' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना वाटलं होतं की हे सगळं एका रात्रीत घडलंय पण, हे काही एका रात्रीत घडणारं नव्हतं. त्यासाठी मला अडीच वर्ष लागली."
दरम्यान, रेखा यांनी 1970 साली 'सावन भादों' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा त्याकाळी सुपरहिट झाला. इतकंच नाही तर रेखा यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे.