Darlings : आमिर, अक्षयनंतर आता आलिया भट्ट नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर; ट्रेंड होतोय #BoycottAliaBhatt , पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:11 PM2022-08-04T13:11:25+5:302022-08-04T13:11:56+5:30

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ व अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमांना बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. आता या ‘हिटलिस्ट’मध्ये आलियाचं नाव सामील झालं आहे.

Boycott Alia Bhatt Twitter Trend Celebrating Domestic Violence On Men Darlings Film | Darlings : आमिर, अक्षयनंतर आता आलिया भट्ट नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर; ट्रेंड होतोय #BoycottAliaBhatt , पण का?

Darlings : आमिर, अक्षयनंतर आता आलिया भट्ट नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर; ट्रेंड होतोय #BoycottAliaBhatt , पण का?

googlenewsNext

आलिया भट ( Alia Bhatt ) सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. सोबत  ‘डार्लिंग्स’ (Darlings) या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे. उद्या 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाद्वारे आलिया निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. साहजिकच हा चित्रपट आलियासाठी खास आहे. पण त्याआधीच सोशल मीडियावर #BoycottAliaBhatt ट्रेंड करत आहे. याआधी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा व अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या सिनेमांना बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होती. पण आता या हिस्ट लिस्टमध्ये आलियाचं नाव सामील झालं आहे.

काय होतोय आलियाला विरोध..?
‘डार्लिंग्स’ हा चित्रपट उद्या रिलीज होतोय. पण त्याआधी ट्रेलर आणि सिनेमाचं पोस्टर पाहून या चित्रपटाला नेटकऱ्यांनी विरोध चालवला आहे. या चित्रपटात पुरुषांवरचा कौटुंबिक हिंसाचार सेलिब्रेट केला जात आहे. त्यावर विनोद केले गेले आहेत, हे गैर असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आरोपी हा आरोपी असतो. त्यात लिंगभेद करता येणार नाही. एखाद्या महिलेवर अत्याचार झालेला दाखवला असता तर त्यावरून गोंधळ झाला असता. मग पुरूषांवरच हा अत्याचार का? असं नेटकऱ्यांचं मत आहे. असे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या ट्विटमध्ये आलियाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. अनेकांनी बॉलिवूडवरही आगपाखड केली आहे. बॉलिवूड कौटुंबिक हिंसाचार प्रमोट करते, असा आरोप अनेक युजर्सनी केला आहे.

आलिया भटच्या या सिनेमा शेफाली शाह, विजय शर्मा, रोशन मॅथ्यू असे अनेक कलाकार आहेत. ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, विजय वर्माने यात आलियाचा पती हमजा शेखची भूमिका साकारली आहे. हमजा पत्नीला अनेक प्रकारे छळतो. पण नंतर ती त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेते. हमजा  पत्नीवर कौटुंबिक अत्याचार करतो आणि त्याचाच सूड घेण्यासाठी ती त्याचं अपहरण करते आणि राहत्याच घरी त्याला त्रास देते. चित्रपटाच्या टीझरमध्ये आलिया तिच्या पतीला तव्याने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना, त्याचं तोंड पाण्याच्या टाकीत बुडवताना दिसतेय. पतीने तिला ज्या पद्धतीने वागवलं, त्याच पद्धतीने ती त्याच्याशी वागताना दिसते. याच दृश्यांवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

Web Title: Boycott Alia Bhatt Twitter Trend Celebrating Domestic Violence On Men Darlings Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.