धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?
By गीतांजली | Published: September 25, 2020 03:54 PM2020-09-25T15:54:58+5:302020-09-25T16:05:19+5:30
शनिवारी दीपिकाला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे.
ड्रग्स प्रकरणात दीपिका पादुकोणच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. शनिवारी दीपिकाला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार त्या व्हाट्सअॅप ग्रुपची अडमिन दीपिका पादुकोणच होती ज्यावर ती ड्रग्स मागत होती. 2017 साली दीपिकाने त्या ग्रुपवर ड्रग्स मागितले होते. रिपोर्टनुसार त्या ग्रुपमध्ये जया शाहा आणि करिश्मा प्रकाशसुद्धा होती. त्यामुळे आता एकूणच दीपिकाच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय.
दीपिकाच्या अडचणीत वाढ
दीपिकाची मॅनेजर करिश्माची चौकशी आज एनसीबी करणार आहे. त्याच दरम्यान अशी माहिती समोर आली की, दीपिकाच त्या व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन होती ज्यावर ड्रग्सबाबत चर्चा झाली. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री केवळ अडकलेल्या दिसत नाहीत तर त्यांची यात सक्रिय भूमिकाही समोर येत आहे.
एनसीबीने केले खंडन
अशात चर्चा होती की, रणवीर सिंहने एनसीबीकडे विनंती केली होती की, त्यालाही चौकशी दरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी द्यावी. पण आता यावर एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही रिक्वेस्ट आलेली नाही. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल.तसेच रणवीर सिंहकडून कोणत्याही प्रकारची विनंती एनसीबीला करण्यात आलेली नाही. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल. तो कथितपणे म्हणाला होता की, दीपिका नर्व्हस होते त्यामुळे त्यालाही चौकशीदरम्यान तिच्यासोबत येऊ द्यावे. एनसीबीने या बातमीचं खंडन केलंय. एनसीबीचा समन्स मिळाल्यानंतर दीपिका गोव्याहुन गुरुवारी रात्री पती रणबीर सिंगसोबत मुंबईत परतली आहे.