कंगना रनौतने एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनला कोकेन घेण्यास सांगितलं होतं? जाणून घ्या नेमका काय होता आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:41 AM2020-09-07T09:41:52+5:302020-09-07T09:53:52+5:30
एकदा तिचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि अभिनेता अध्ययन सुमनने कंगनावरच ड्रग्स घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप लावला होता.
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्सचा अॅंंगल समोर येताच कंगनाने आरोप केला होता की सिने इंडस्ट्रीतील ९९ टक्के ललोक ड्रग्सचं सेवन करतात. पण एकदा तिचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि अभिनेता अध्ययन सुमनने कंगनावरच ड्रग्स घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप लावला होता.
सध्या अध्ययन सुमनचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने दावा केला होता की, एकदा कंगना रनौतच्या एका मोठ्या पार्टीत जेव्हा त्याने कोकेन घेण्यास मनाई केली होती, तेव्हा ती त्याच्याशी खूप भांडली होती.
कंगनाने टाकला होता दबाव?
२०१६ मध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अध्ययन सुमन म्हणाला होता की, '२००८ मध्ये मार्चमध्ये हॉटेल 'द लीला' येथे आयोजित आपल्या बर्थडे पार्टीत कंगना रनौतने तिच्या सर्वच सहकाऱ्यांना बोलवलं होतं. ती म्हणाली होती की, 'चला आज रात्री कोकीन घेऊ'. याआधी तिच्यासोबत मी काहीवेळा हॅश प्यायलो होतो आणि मला ते आवडलं नव्हतं. त्यामुळे मी नकार दिला होता. मला आठवतं त्या रात्री यावरून तिचं आणि माझं खूप भांडण झालं होतं'.
आता कंगनावरच ड्रग्स घेण्याचा आरोप असल्यावर तिनेच इंडस्ट्रीमधील लोकांवर ड्रग्स घेण्याचा आरोप लावलाय. इतकेच नाही तर ती असंही म्हणाली होती की, अभिनेता रणवीर सिंह, रणबीर कपूर विक्की कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची ब्लड टेस्ट केली पाहिजे. जेणेकरून हे सिद्ध व्हावं की, ते ड्रग्स घेतात की नाही.
कंगनाबाबत आता काय म्हणाला अध्ययन?
दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने सांगितले की, 'मी माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये काही मोठ्या पार्टीजमध्ये गेलो होतो. तिथे मी मोठ्या कलाकारांनी ड्रग्स घेताना पाहिलं होतं. असं म्हणणं चुकीचं ठरेल की, पूर्ण बॉलिवूड असं करतं. इंडस्ट्रीतील काही हाय-प्रोफाइल लोक असे आहेत जे ड्रग्स घेतात. हे फार दुख:द आहे. मी अशा लोकांच्या ग्रुपचं भाग होणं स्वीकारलं नाही आणि ना ड्रग्सचा स्वीकार केला'.
अध्ययन म्हणाला की, ड्रग्स केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत लिमिटेड नाही. तसेच बॉलिवूडमध्ये ९९ लोक ड्रग्स अॅडिक्ट आहेत या कंगनाच्या वक्तव्यावरही अध्ययन बोलला. कंगनाच्या या वक्तव्यावर फार जास्त टीका होत आहे. पण अध्ययनने कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रतिक्रिया देणं टाळलं. तो म्हणाला की, कंगना फार मोठी स्टार आहे आणि मी एक छोटा कलाकार आहे. मला तिच्या वक्तव्यावर काही बोलायचं नाही. हेच माझ्यासाठी चांगलं आहे. जर मी तिच्याबाबत काही बोललो तर ते चुकीचं ठरेल. ती मोठी स्टार आहे तिला खूप काही माहीत आहे. त्यामुळे मी गप्प राहणं योग्य समजेन'.
VIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द!
वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा