सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:11 PM2020-09-17T12:11:07+5:302020-09-17T12:13:13+5:30
सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला टार्गेट केलंय.
लॉकडाऊनदरम्यान प्रवासी मजूरांची मदत करण्यासाठी आणि गरजूंसाठी समोर येणारा अभिनेता सोनू सूद सध्या बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर सेलिब्रिटी आहे. सोनू सोबतच कंगनाही गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत आहे. दोघे एकत्र 'मणिकर्णिका' सिनेमात काम करणार होते. पण सोनूने हा सिनेमा सोडला आणि तेव्हापासून दोघांमध्ये बिनसलंय. सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला टार्गेट केलंय.
सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सन्मान मिळवण्यासाठी समोर या. केवळ प्रसिद्ध होण्यासाठी नाही. असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत जे आता कधीच सन्मान मिळवू शकणार नाहीत'.
इज़्ज़त कमाने निकलना।
— sonu sood (@SonuSood) September 16, 2020
मशहूर होने नहीं।
मशहूर तो बहुत से लोग हैं
जो अब कभी इज़्ज़त नहीं कमा पाएँगे।
कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. अशात असं मानलं जात आहे की, सोनूने हे ट्विट नाव न घेता कंगनाला टार्गेट करण्यासाठी केलंय.
मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है।
— sonu sood (@SonuSood) September 3, 2020
सलाम करोगे तो सलामी मिलेगी। 🇮🇳
दरम्यान जेव्हा कंगना रणौतने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती तेव्हाही सोनू सूदने ट्विट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, ''मुंबई...हे शहर नशीब बदलतं. सलाम कराल तर सलामी मिळेल'.
सोनू सूद आधी कंगनाचा सिनेमा 'मर्णिकर्णिका'मध्ये काम करत होता. त्याने ४५ दिवसांचं शूटींगही पूर्ण केलं होतं. पण नंतर कंगना दिग्दर्शनची कमान स्वत: हाती घेतल्यावर सोनूने सिनेमा सोडला. नंतर कंगनाने सोनूवर आरोप लावला होता की, त्याला एका महिलेच्या दिग्दर्शनाखील काम कराचयं नव्हतं. म्हणून त्याने सिनेमा सोडला.
कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पलटवार
कंगनाने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. ती ट्विट करत म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?
रवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला होता.
बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप
जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला
उर्मिला मातोंडकर कंगणावर बरसली, नुसती घाण परवण्याची काय गरज आहे