तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 04:25 PM2020-10-03T16:25:40+5:302020-10-03T16:28:13+5:30

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावरून तनुश्री दत्ताने मौन सोडलं आहे.

Do not compare my harassment case to Payal Ghosh sexual harassment allegations says Tanushree Dutta | तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -

तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेला लैंगिक शोषणाचा किंवा मीटूचा आरोप म्हणजे तनुश्री दत्ताने केलेला आरोप होता. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. त्यानंतर अशाप्रकारच्या इतरही काही गोष्टी समोर आल्या होत्या. आता अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावरून तनुश्री दत्ताने मौन सोडलं आहे. तनुश्रीने सर्वांना अपील केली आहे की, तिच्या लैंगिक शोषणाच्या केसची तुलना पायल घोषच्या आरोपांसोबत करू नये.

एका वेबसाइटसोबत बोलताना तनुश्री म्हणाली की, इतर सर्व लोकांप्रमाणे ती सुद्धा पायल घोषच्या केसवर कन्फ्यूज आहे आणि त्यामुळे तिला यावर काहीही बोलायचं नाहीये. आपल्या स्टेटमेंटमध्ये तनुश्रीने लिहिले की, 'काही पेड प्रोपोगंडा चालवणारे पत्रकार आणि ट्विटर ट्रोल्स माझ्या केसची तुलना पायल घोषच्या केसससोबत करत आहेत. जेणेकरून नाना पाटेकरला निर्दोष दाखवता येईल'. आपल्या या स्टेटमेंटमध्ये तनुश्रीने नानावर आरोप लावत म्हणाली की, खूपसारे पुरावे दिल्यानंतरही त्यांनी लॉ एंड ऑर्डर खरेदी करून तिची लीगल हरॅसमेंटही केली.

तनुश्रीने आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिले की, 'मला पायल घोषवर काहीच बोलायचं नाहीये. कारण इतर लोकांप्रमाणे मी सुद्धा कन्फ्यूज आहे. पण 'हॉर्न ओके प्लीज' दरम्यान केलं गेलेलं लैंगिक शोषण बॉलिवूडच्या इतिहासावर एक काळा डाग आहे. आणि तो तोपर्यंत राहणार जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही आणि माझं करिअर पुन्हा सुरू होणार नाही. या गुन्ह्यासाठी कुणालातरी किंमत चुकवावीच लागेल'.

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. आपल्या तक्रारीत पायल म्हणाली की, ऑगस्ट २०१३ मध्ये अनुराग कश्यपने तिला घरी बोलवून तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अनुरागची चौकशी केली. अनुरागने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला की, ऑगस्ट २०१३ मध्ये तो भारतात नाही तर श्रीलंकेत होता. 

Web Title: Do not compare my harassment case to Payal Ghosh sexual harassment allegations says Tanushree Dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.