वयाच्या तिसऱ्या वर्षी फातिमा शेखवर लैंगिक अत्याचार; 'दंग गर्ल'ने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:49 PM2021-09-13T12:49:43+5:302021-09-13T12:50:28+5:30
Fatima sana shaikh : अभिनेत्री फातिमा सना शेखने बालवयात तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं होतं, असं तिने सांगितलं आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून ठरला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर निघृणपणे बलात्कार करण्यात आला. या महिलेचा शनिवारी मृत्यु झाला. परंतु, तिच्या वेदनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. यामध्येच अभिनेत्री फातिमा सना शेखने बालवयात तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं होतं, असं तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे याचवेळी ती बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवरही व्यक्त झाली.
जशी माय तशी लेक! सोनाली खरेच्या मुलीचे 'हे' ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच
गेल्या वर्षी फातिमा सना शेखने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती कलाविश्वातील कास्टिंग काऊच आणि बालपणात तिने सहन केलेला अन्याय यावर व्यक्त झाली आहे.
Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना
"मी केवळ तीन वर्षांची होते त्यावेळी माझा विनयभंग करण्यात आला होता. हा एक प्रकारचा असा कलंक आहे ज्यावर स्त्रिया कधीच उघडपणे व्यक्त होत नाहीत. परंतु, आता हळूहळू का होईना काळ बदलेलं अशी मला आशा आहे. देशातील आणि जगातील लोकांमध्ये लैंगिक छळाबाबत असलेली जागृकता वाढू लागली आहे. पण, एक काळ असा होता की लोकांमध्ये गैरसमज होईल या भीतीने कोणीही या मुद्द्यावर खुलेपणाने व्यक्त होत नव्हतं."
कास्टिंग काऊचचाही केला खुलासा
"कास्टिंग काऊचमुळे अनेकदा माझ्या हातातून कित्येक कामं गेली आहेत. तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही. तू दीपिका किंवा ऐश्वर्यासारखी दिसत नाही. तू कशी काय अभिनेत्री होशील? अनेकदा लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांच्या मते केवळ सुंदर दिसणारीच मुलगी अभिनेत्री होऊ शकते. पण मी त्यांच्या साच्यात बसत नाही. मात्र, आता माझ्याकडे अनेक संधी आहेत. जे सर्वसामान्य आणि सरासरीचे असतात, जे सुपरमॉडल्स नसतात अशा माझ्यासारख्या व्यक्तींसाठीही चित्रपट तयार केले जातात."
दरम्यान, "मला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला. जर तू शरीरसंबंध ठेवलेस तरच तुला काम मिळेल, असंही मला एकेकाळी सांगण्यात आलं होतं," असं म्हणत सनाने कलाविश्वातील कास्टिंग काऊचवर मौन सोडलं आहे.