Lalit Modi marry with Sushmita Sen : IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत केलं लग्न?, ७ मिनिटांत दुसरं ट्विट करून दिलं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 08:35 PM2022-07-14T20:35:07+5:302022-07-14T20:50:14+5:30

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ही जगातील सर्वात यशस्वी लीग ज्यांच्या संकल्पनेतून साकारली त्या ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी मोठी बातमी दिली.

Former IPL chairman Lalit Modi announces his wedding with actor Sushmita Sen | Lalit Modi marry with Sushmita Sen : IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत केलं लग्न?, ७ मिनिटांत दुसरं ट्विट करून दिलं स्पष्टिकरण

Lalit Modi marry with Sushmita Sen : IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत केलं लग्न?, ७ मिनिटांत दुसरं ट्विट करून दिलं स्पष्टिकरण

googlenewsNext

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ही जगातील सर्वात यशस्वी लीग ज्यांच्या संकल्पनेतून साकारली त्या ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी मोठी बातमी दिली. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेन ( Sushmita Sen) हिच्यासोबत लग्न केल्याचे जाहीर केले. ''मालदिव येथून कुुटुंबीयांसोबत पिकनिकवरून नुकताच लंडनला परतलो. हो एक सांगायचंय सुश्मिता सेन ही आता माझी बेटर हाफ आहे. ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे,'' असे ट्विट ललित मोदी यांनी केले. त्यामुळे त्यांचे सुश्मितासोबत लग्न झाल्याच्या  बातम्या आल्या. पण सात मिनिटांत त्यांनी दुसरं ट्विट करून लग्न केले नसल्याचे स्पष्ट करताना आम्ही एकमेकांना डेट करतोय, असे सांगितले. 


१९९४ या वर्षीची मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन बॉलीवूडमधील एक आदर्श सिंगल मदर ओळखली जाते. लग्न न करताच एका मुलीला दत्तक घेऊन सुश्मिता त्यावेळी एक कौतुकाचा विषय ठरली होती. रिनी सेन ही तिने दत्तक घेतलेली पहिली मुलगी. त्यानंतर काही वर्षांनी तिने आणखी एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अलिशा. रिनी आणि अलिशा या दोघीही आयुष्यात आल्या आणि त्यांनी माझं आयुष्य आणखी सुंदर केलं, असं ती नेहमीच म्हणते. 
 

   

Web Title: Former IPL chairman Lalit Modi announces his wedding with actor Sushmita Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.