जेनेलियाच्या फॅन्ससाठी खुशखबरी, पती रितेश देशमुखसोबत करणार कमबॅक
By तेजल गावडे | Published: October 13, 2020 09:07 PM2020-10-13T21:07:09+5:302020-10-13T21:07:42+5:30
जेनेलिया लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याचे समजते आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाने एकत्र २००३ साली तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दोघांनी तुझे मेरी कसम चित्रपटाशिवाय मस्ती, तेरे नाल लव हो गया चित्रपटात काम केले आहे. २०१२ साली जेनेलिया आणि रितेश विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत राहिल आणि रियान.
प्रभात खबरच्या रिपोर्टनुसार, खऱ्या आयुष्यातील हे जोडपे रील लाइफमध्ये काम करताना दिसणार आहे. जेनेलियाने सांगितले की, हा खूप मोठा काळ आहे. मला आशा आहे की मला संधी मिळेल. वास्तविकतेत मी सध्या काही इंटरेस्टिंग स्क्रीप्ट वाचते आहे. त्यावर रितेश म्हणाला की, बस आता याला होकार दे.
लहान मुलांच्या संगोपनाबद्दल जेनेलिया म्हणाली की, मला वाटते की मुलांसाठी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जीवनाचा अनुभव घेणे खूप महत्त्वपूर्ण आहे. हे तथ्य पाहता रितेश शहर आणि ग्रामीण भागात वाढला आहे. पण मुलांना फक्त शहरी संगोपन दिले आहे. मुलांना प्रकृती आणि प्राण्यांच्या जवळ ठेवणे चांगले असते.
एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिने स्वत: ही माहिती दिली. कुटुंबासोबत वेळ घालवताना मी सोबत सोबत कॅमेराही मिस करतेय. कदाचित आता ती वेळ आलीये, असे जेनेलिया म्हणाली. ‘ मी लाइफ सेटल करताना प्रत्येक गोष्टीबाबत क्लिअर होते. पती रितेश देशमुख आणि रियान व राहिल यांच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्यासोबत राहायचे होते. सेटवर लहान मुलांबद्दल विचार करून मला ताण घ्यायचा नव्हता. काम करताना अन्य कोणताही विचार मनात येता कामा नये, असे मला वाटायचे. आता मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. आता मी नि:संकोच कामावर परतू शकते,’ असे ती म्हणाली.
जेनेलियाचे चाहते तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.