सवतींमधील वाद मिटेना; हेमा मालिनीने केली नातवाच्या लग्नाकडे पाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:47 AM2023-06-19T10:47:19+5:302023-06-19T10:48:51+5:30

Hema malini:धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांच्यात असलेलं कटू नातं साऱ्यांनाच ठावूक आहे.

hema malini and daughters esha deol ahana deol misses karan deol wedding | सवतींमधील वाद मिटेना; हेमा मालिनीने केली नातवाच्या लग्नाकडे पाठ?

सवतींमधील वाद मिटेना; हेमा मालिनीने केली नातवाच्या लग्नाकडे पाठ?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) याच्या मुलाचं करण देओलचं नुकतंच थाटात लग्न पार पडलं. करणने त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्य हिच्यासोबत पंजाबी पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा रंगत असून अभिनेत्री हेमा मालिनीदेखील चर्चेत आल्या आहेत. घरचं लग्न असतानाही हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही लेकी उपस्थित नसल्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.

हेमा मालिनी ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. त्यामुळे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांच्यात असलेलं कटू नातं साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे करणचं लग्न असूनही हेमा मालिनी या लग्नाला हजेरी न लावल्याचं म्हटलं जात आहे.

करणच्या लग्नातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये हेमा मालिनी आणि तिच्या दोन लेकी इशा अन् आहाना कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे हेमा मालिनी यांनी मुद्दाम या लग्नाला येण्याचं टाळलं का? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

हेमा मालिनी जरी या लग्नसोहळ्याला आली नसली तरीदेखील इशा देओल करणच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी होणार आहे. ही रिसेप्शन पार्टी ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये होणार आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाशकौरसोबत केलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांनी हेमा मालिनीसोबत (hema malini) दुसरा संसार थाटला. विशेष म्हणजे आजपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचं मूळ घर पाहिलेलं नाही. 
 

Web Title: hema malini and daughters esha deol ahana deol misses karan deol wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.