ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:33 IST2020-02-18T15:25:39+5:302020-02-18T15:33:57+5:30
नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला.

ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली
बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचे ब्रेकअप मध्यंतरी जाम चर्चेत होते. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला. इतके कमी की काय म्हणून अनेक रिअॅलिटी शोमध्येही एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीच्या आठवणीने ढसाढसा रडली. हिमांश मात्र इतके होऊनही गप्प राहिला. पण आता मात्र त्यानेही चुप्पी तोडली आहे.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांशला नेहासोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारला गेला. यावर हिमांशने जे काही उत्तर दिले, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
तो म्हणाला, ‘माझ्याकडून हे वाईट ब्रेकअप झाले नव्हतेच. पण चर्चा सुरु झाल्या आणि सगळ्या गोष्टी बिघडायला लागल्या. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ होता. आता मी त्यातून बाहेर आलो आहे. पण त्यावेळी लोकांच्या नजरेत मी विलेन ठरलो. मला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले. कुणालाही रिअल स्टोरी माहित नाही आणि तरीही मला सरसकट खलनायक ठरवले गेले. ती टीव्हीवर रडली आणि लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला.
सगळा दोष माझ्या माथ्यावर फोडून ती नामनिराळी राहिली. मी सुद्धा बोलावे, असे मला अनेकदा वाटले. पण मी योग्य वेळेची प्रतीक्षा करायचे ठरवले. माझा तो निर्णय अगदी योग्य होता. कारण कालांतराने माझ्या मनातला राग कमी झाला. शेवटी एकेकाळी ज्या व्यक्तिवर मी जीवापाड प्रेम केले, तिच्याविरोधात मी कसा काय बोलू शकतो. ती माझ्या प्रेमाची व्याख्या नव्हती. तू माझ्यासोबत असे का केलेस, हा प्रश्न मी तिला कधीच केला नाही. पण या सगळ्यामुळे मी प्रचंड हर्ट झालो,’ असे हिमांशने सांगितले.
ब्रेकअपच्या कारणाबद्दल विचारले असता हिमांशने काहीही बोलण्यास नकार दिला. त्यावेळी खूप सा-या गोष्टी घडल्या. आता मी त्यावर बोलू इच्छित नाही, केवळ एवढेच उत्तर त्याने दिले.