‘मी पण एक माणूस आहे’; झायरा वसीमने ट्विटरवर वापसी करत सांगितले अकाऊंट डिअॅक्टिवेट केल्याचे ‘हे’ कारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 06:36 PM2020-05-31T18:36:51+5:302020-05-31T18:48:21+5:30
नुकतेच तिने टोळधाडीला ‘अल्लाह का कहर’ म्हटले होते. यामुळे ती ट्रोल देखील झाली होती. आता तिने ट्विटरवर वापसी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दंगल गर्ल अभिनेत्री झायरा वसीम चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने टोळधाडीला ‘अल्लाह का कहर’ म्हटले होते. यामुळे ती ट्रोल देखील झाली होती. आता तिने ट्विटरवर वापसी केली आहे. ट्विटरवर वापसी करत तिने अकाऊंट का डिअॅक्टिवेट केले होते याचे कारण सांगितले आहे.
Because I’m just a human, like everyone else, who’s allowed to take a break from everything whenever the noise inside my head or around me reaches it’s peak :) pic.twitter.com/BMar06jIXl
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) May 30, 2020
अभिनेत्री झायरा वसीमने काही दिवसांपूर्वी तिचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिवेट केले होते. आता ती पुन्हा ट्विटरवर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने टिवट करून कोरोना, टोळधाड या आपत्तीचे कारण आपल्या वाईट कर्मांचे फळ असल्याचे सांगितले आहे. तिच्या एका टिवटवर एका युजरने विचारले की, झायराने अकाऊंट डिअॅक्टिवेट का केले होते? असे विचारले असता तिने सांगितले,‘कारण मी देखील दुसऱ्यांप्रमाणेच एक माणूस आहे. जेव्हा माझ्या डोक्यातील विचारांचा आणि आसपासचा गोंधळ हद्दीच्या बाहेर जाईल तेव्हा मलाही ब्रेक घ्यावा असे वाटू शकते.’
5 years ago I made a decision that changed my life and today I’m making another one that’ll change my life again and this time for the better Insha’Allah! :) https://t.co/ejgKdViGmD
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) June 30, 2019
झायरा वसीमने ट्विट करत अकाऊंट डिअॅक्टिवेट का केले हे तिने सांगितले,‘मी टोळधाडीच्या बाबतीत जे ट्विट केले होते त्यावरून नेटिझन्सनी मला ट्रोल करायला चालू केले होते. त्यानंतर तिचे अकाऊंट डिअॅक्टिवेट झाले. नेटिझन्सनी तिने अकाऊंट का डिअॅक्टिवेट केले? यावरून प्रश्न उपस्थित केले होते.