'मी लढणार आणि जिंकणारही, माझे सत्यच मला देतं बळ', रियाने आरोप करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:15 PM2020-09-02T13:15:20+5:302020-09-02T13:17:36+5:30

रिया चक्रवर्तीने तिच्यावरील आरोपांवर प्रत्युत्तर देत म्हटले की माझे सत्यच मला लढण्यासाठी ताकद देते.

I will fight and I will win, my truth will be given to me, Rhea replied to the accusers | 'मी लढणार आणि जिंकणारही, माझे सत्यच मला देतं बळ', रियाने आरोप करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

'मी लढणार आणि जिंकणारही, माझे सत्यच मला देतं बळ', रियाने आरोप करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने नुकतेच इंडिया टीव्हीचे कंसल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्यासोबत बातचीत केली. त्यावेळी तिने आपल्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, मी लढणार आणि जिंकणार. माझे सत्यच मला ताकद देते. 

रियाने या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या नात्यासोबत आरोपांबद्दल खुलासे केले. तिने सुशांतबद्दल सांगितले की, आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना भेटले, त्यातील सुशांत सर्वात प्रामाणिक व्यक्ती होता. जेवढे प्रेम त्याने मला दिले त्याचा मला अभिमान वाटतो. आमची मैत्रीच्या आधारावर आमचे नाते होते. तुमच्या जीवनातील यश अपयश विसरून कोणी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतो. हे सगळे खूप भावते. 

सुशांतच्या डिप्रेशनमुळे रिया त्याला सोडून गेली, असे बोलले जात होते. मात्र त्यावर रिया म्हणाली की, नाही.उलट त्याच्या डिप्रेशनमुळे मी जास्त जवळ आले. जेव्हा तुम्ही कोणाची काळजी घेता तेव्हा तुम्ही त्याची आई किंवा नर्स बनता. आपण त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करू लागतो.


रिया पुढे म्हणाली की, कदाचित माझ्या कुटुंबाने आत्महत्या केली पाहिजे किंवा कुणीतरी येऊन आम्हाला गोळी मारावी. आम्हाला अपमानास्पद वाटत आहे. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. आमच्याकडे इज्जतीशिवाय काहीच नाही. आज मला एक ड्रग डीलर सांगितले जातंय काल मला हत्यारी म्हटले जात होते. हे अंतहीन आणि आधारहीन आहे.

मी लढणार आणि जिंकणार. मला वाटते की हा विजय फक्त माझ्यासाठी नको उलट त्या प्रत्येक स्त्रीसाठी असावा जिला शिव्या दिल्या जातात. तिचा तिरस्कार केला जातो. कारण तिचे कुणावर तरी प्रेम होते आणि त्याच्यासोबत राहत होती.

Web Title: I will fight and I will win, my truth will be given to me, Rhea replied to the accusers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.