...माझ्यावरही बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 07:00 IST2020-08-06T07:00:00+5:302020-08-06T07:00:00+5:30
राधिका सिनेइंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

...माझ्यावरही बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राधिका आपटे हिने स्थान निर्माण केले आहे. राधिका सिनेइंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिची नुकतीच नेटफ्लिक्सवर रात अकेली है ही वेबफिल्म भेटीला आला आहे. यात तिच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. राधिका आपटेने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या तरूणपणीच्या आठवणी सांगताना राधिकाने हा खुलासा केला आहे.
राधिका आपटेने झगमगत्या सिनेइंडस्ट्रीबद्दल खुलासा केला. राधिका म्हणाली की, मला सुरूवातीला पुण्यावरून मुंबईला येताना अनेकांनी विरोध केला. मुंबईत आल्यावर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ नये असे अनेकांना वाटत होते. प्रत्येकाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी ना काही त्रास सहन करावा लागतो. त्यातूनही भयानक म्हणजे कोणीच कधीच या विषयी काही बोलत नाही. अगदी शेवटच्या टप्प्यावर याविषयी बोलले जाते.
आम्ही कलाकारही माणसेच आहोत. तुमच्या लोकांसारखीच मी एक आहे. आम्हालाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगायचे असते.
नेटफ्लिक्सवर राधिकाच्या सतत येणाऱ्या वेबसिरीज आणि फिल्मबद्दल राधिका म्हणाली, माझे नेटफ्लिक्सबरोबर चांगले संबंध आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मचे या चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म लहान चित्रपटांसाठी अधिक फायदेशीर आहे.