मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं
By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 08:32 PM2020-09-25T20:32:39+5:302020-09-25T21:32:19+5:30
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची.
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची. विराट कोहली ( Virat Kohli) फलंदाजी करताना गावस्कर यांनी लॉकडाऊन काळातील विराट-अनुष्का शर्माच्या एका व्हिडीओवरून कमेंट केली आणि नेटिझन्सनी त्याचा चुकीचा अर्थ लावून माजी क्रिकेटपटूवर टीका केली. नेटिझन्सच्या या टीकेनंतर विराटची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हीनं इस्टाग्रावर एक मोठी पोस्ट लिहून गावस्कर यांच्यावर टीका केली. आता या वादात कंगना राणौतनं ( Kangana Ranaut) उडी घेतली आहे. DC vs CSK Latest News & Live Score
IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली
KL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. विराट कोहली तिसऱ्याच षटकात माघारी परतला. हिंदीत समालोचन करताना गावस्कर यांनी विराटच्या निराशाजनक कामगिरीवर म्हटले की,''विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.'' लॉकडाऊनमध्ये विराट-अनुष्काचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन गावस्कर यांनी हे विधान केलं होतं. परंतु त्यांच्या या विधानानं चाहते चांगलेच भडकले आहेत.DC vs CSK Latest News & Live Score
शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली. तिनं लिहिलं की,''तुम्ही केलेली कमेंट त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीवर पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत, याचं उत्तर मला द्यायला आवडेल. गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?''
लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद
IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका
''2020वर्ष आलं, परंतु माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? गावस्कर तुम्ही या जंटलमन्स खेळाचे दिग्गज खेळाडू आहात. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की, तुमच्या विधानानं दुःख झाले,''असेही अनुष्का म्हणाली.
कंगना राणौत काय म्हणाली?
मला धमकावण्यात आलं आणि हरामखोर बोललं गेलं, तेव्हा अनुष्का शर्मा गप्प बसली. पण, आज तिच्यावर टीका झाली तर तिने लगेच प्रतिक्रिया दिली. सुनील गावस्कर यांनी तिचा उल्लेख केला, याचा मी निषेध करते, परंतु हा सोयीनुसारचा Feminism आहे.
#Anushka remained quiet when I was threatened and called Haramkhor but today the same misogyny coming to bite her, I condemn the fact that she was dragged in to cricket by #SunilGavaskar but selective feminism is equally uncool.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 25, 2020
Only a sex starved pervert will find sexual context to #SunilGavaskar’s statement which he made on national television for a woman, he should’ve not mentioned her, but Anushka is playing a cricketer in her next and there are several videos of her practising with her husband.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 25, 2020