तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 21:06 IST2021-03-03T21:05:26+5:302021-03-03T21:06:29+5:30
आयकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते, की टॅक्स चोरीप्रकरणात फॅन्टम फिल्मशी संबंधित मंडळींवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि इतर काही लोक सामील आहेत. फॅन्टम फिल्म्सच्या माध्यमाने कर चोरी प्रकरणात इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे. (IT raids on four companies)

तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी
मुंबई - आयकर विभागाने (IT) राज्यात मोठी कारवाई केली आहे. तापसी-अनुराग यांच्यानंतर आता चार कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात फॅन्टम फिल्म (phantom films), क्वान (kwan), एक्सीड (exceed) आणि रिलायन्स एंटरटेनमेन्टचा (reliance entertainment) समावेश आहे. यापूर्वी बुधवारी टॅक्स चोरीच्या संशयावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापशी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. एवढेच नाही, तर आयकर विभागांने त्यांची कसून चौकशीही केली. (IT raids on four companies reliance entertainment kwan exceed and phantom films)
ट्विट्स, जोक्स, मीम्स...! तापसी पन्नू व अनुराग कश्यपवरच्या धाडसत्रानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर
आयकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते, की टॅक्स चोरीप्रकरणात फॅन्टम फिल्मशी संबंधित मंडळींवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि इतर काही लोक सामील आहेत. फॅन्टम फिल्म्सच्या माध्यमाने कर चोरी प्रकरणात इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यात जवळपास 20 ते 22 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला आहे. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, मधू मनटेना, विकास बहल आदींशीवाय फॅन्टम फिल्म्स आणि तीन इतर कंपन्यांच्या कार्यालयांचाही समावेश आहे.
'थप्पड'नंतर तापसी पन्नू पुन्हा एकदा दिसणार पवैल गुलाटीसोबत, अनुराग कश्यपच्या या सिनेमात
फॅम्टम फिल्म्सची स्थापना -
2011 मध्ये अनुराग कश्यप, मधू मनटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल यांनी फॅम्टम फिल्म्सची स्थापना केली होती. मात्र, ऑक्टोबर 2018 मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती. सूत्रांचे म्हणणे आहे, की कपंनी आणि यांच्यावतीने फाईल केलेले रिटर्न जुळत नाहीत. हा थेट टॅक्सचोरीचाच संकेत आहे.