अभिनेत्री काजोलने लेकीसाठी घेतला मोठा निर्णय, सिंगापूरमध्ये होणार शिफ्ट ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:34 AM2020-09-01T11:34:47+5:302020-09-01T11:41:21+5:30
न्यासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा आपल्या लूक्समुळे नेहमी चर्चेत असते. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार काजोल मुलीसोबत सिंगापूरमध्ये राहणार असल्याची चर्चा आहे. तर अजय देवगण मुलगा युगसोबत मुंबईत राहणार आहे.
सिंगापूरला जाणार काजोल
रिपोर्टनुसार, न्यासा सिंगापूरमध्ये शिक्षण घेते आहे. न्यासाच्या अभ्यासावर कोणाताही परिणाम होऊ नये अशी काजोल आणि अजय देवगनची इच्छा आहे. कोरोनाच्या महामारीमुळे काजोल आणि अजय देवगण न्यासाला सिंगापूरमध्ये एकटे राहू द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता न्यासासोबत सिंगापूरमध्ये काजोल राहणार आहे. पुढचे काही महिने काजोल न्यासासोबत राहणार आहे. अजय देवगणने सिंगापूरमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केला आहे, जेणेकरुन काजोल आणि न्यासाला राहण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये.
मुंबईत मुलासोबत राहणार अजय देवगण
अजय देवगण मुलगा युगसोबत मुंबईत राहणार आहे. रिपोर्टनुसार अजय सध्या दोन स्क्रिप्टवर काम करतो आहे. याशिवाय तो आपल्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शनमध्ये बिझी आहे. कोरोनामुळे अजयचा सिनेमा मैदानची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल.
प्रेम जुळवता जुळवता अजय देवगण स्वतःच अडकला काजोलच्या प्रेम जाळ्यात, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी