काय तर म्हणे, १६ व्या वर्षीच होते डिप्रेशनमध्ये, आमिर खानची लेक इरा खानवरही कंगणाने साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 05:47 PM2020-10-13T17:47:02+5:302020-10-13T17:47:47+5:30
काही दिवसांपूर्वीच इरा खानने डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. वयाच्या १६ वर्षापासून इराने डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
साऱ्या जगाच्या नजरा सध्या एकाच अभिनेत्रीवर आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत. दिवसेंदिवस तिला ज्या व्यक्तीवर आपले मत मांडायचे असते ती त्याच्यावर आपले मत मांडून मोकळी होते. बॉलिवूडच्या दिग्गज लोकांवर बोलून झाल्यानंतर आता तिच्या निशाण्यावर आहे आमिर खानची मुलगी इरा खान, काही दिवसांपूर्वीच इरा खानने डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. वयाच्या १६ वर्षापासून इराने डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
At 16 I was facing physical assault, was single handedly taking care of my sister who was burnt with acid and also facing media wrath, there can be many reasons for depression but it’s generally difficult for broken families children, traditional family system is very important. https://t.co/0paMh8gTsv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
हिच बाब कंगणाने पकडली आणि इरावर निशाणा साधला. कंगणाने म्हटले की, इथे लोक १६ वर्षी डिप्रेशनचा सामना कसा केला यावर बोलतात, तेव्हा मी १६ वर्षाची असताना वेगळ्याच गोष्टींना एकटीने लढा देत होते. मला मारहाण झाली होती. अॅसिड अटॅक झालेल्या माझ्या बहिणीची काळजी घेत होते. तरीही मी खंबीर राहिले.
डिप्रेशन येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण कुटुंबच एकत्र नसेल तर अशा कुटुंबातल्या मुलांना नैराश्याशी सामना करणं अवघड जातं. आजच्या घडीला एकत्र कुटुंब असणे खूप गरजेचे आहे. कंगणाने आमिर खानच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या पत्नीसह झालेला घटस्फोटाविषयी उघडपणे बोलली नसले तरी तिचा निशाणा त्यावरच असल्याचे स्पष्ट होते.
डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा
दीपिकानेदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. सुशांतच्या मृत्यूलाही तिने डिप्रेशनशी जोडले. सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. दीपिका पोस्टमध्ये म्हणाली होती, "माझ्या मागून बोला, डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे दुखी होणे नाही, माझ्या मागून बोला तुम्ही डिप्रेशनपासून कधीच दूर पळू शकत नाही. कंगनानेदेखील आपल्या या ट्वीटमध्ये दीपिकाच्या माझ्या मागून बोला या वाक्याचा उपयोग केला आहे. ज्यावरून तिने हे दीपिकाला उद्देशूनच म्हटल्याचे स्पष्ट होते.
हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज
प्रत्येक मुद्यावर परखडपणे मत मांडणा-या कंगनाने या जाहिरातीवर जोरदार टीका केली. ‘हे क्रिएटीव्ह दहशतवादी आपल्या अचेतन मनात काय काय भरत आहेत, याबद्दल हिंदू या नात्याने आपण सर्वांनी सतर्क राहायला हवे. आपल्या डोक्यात जे काही भरवले जातेय, त्याचा आपल्यावर काय परिणाम संभवतो, याचा योग्य विचार करणे गरजेचे आहे. आपली सभ्यता वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे,’ असे ट्विट कंगनाने केले.