कंगना रनौतने 'जल्लीकट्टू' ऑस्करला गेल्यावर पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, म्हणाली -...
By अमित इंगोले | Published: November 26, 2020 11:25 AM2020-11-26T11:25:24+5:302020-11-26T11:30:54+5:30
बुधवारी तिने 'जल्लीकट्टू' हा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेल्याने सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मुव्ही माफियावर निशाणा साधला.
कंगना रणौत सोशल मीडियावर आपली बिनधास्त मते मांडण्यासाठी आणि वादग्रस्त ट्विट करण्यासाठी लोकप्रिय आहे. जेव्हापासून ती ट्विटरवर आली आहे तेव्हापासून वेगवेगळ्या वादांना तिच्यामुळे तोंड फुटलंय. बॉलिवूड स्टार्सना नेहमीच निशाण्यावर घेणाऱ्या कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड माफियांना घेरलं आहे ते ऑस्कर नामांकनाच्या निमित्ताने. बुधावारी तिने 'जल्लीकट्टू' हा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेल्याने सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मुव्ही माफियावर निशाणा साधला.
कंगना रणौतने ट्विट केलं की, बॉलिवूड विरोधात जेवढा आवाज उठवला जात होता, जेवढी चौकशी केली जात होती अखेर त्यातून काहीतरी फायदा झाला. भारतीय सिनेमे केवळ फिल्मी परिवारांसाठी नाहीयेत. मुव्ही माफिया आता आपल्या घरातच लपले आहेत आणि ज्युरीजना आपलं काम करू देत आहेत. टीम 'जल्लीकट्टू' ला शुभेच्छा'.
All the scrutiny/ bashing Bullydawood gang got is finally yielding some results, Indian films aren’t just about 4 film families, movie mafia gang is hiding in their houses and letting juries do their job and congratulations team #Jallikattuhttps://t.co/kI9sY4BumE
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 25, 2020
बुधवारी दिग्दर्शक लिजो जोस पेल्लिसेरीचा सिनेमा 'जल्लीकट्टू' ला ९३व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री मिळाली आहे. या सिनेमाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागात नामांकन मिळालं आहे. या सिनेमात एंथनी वर्गीज, चेंबन विनोद जोस, सॅंथी बालाचंद्रनसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
भारताकडून ऑस्करच्या रेसमध्ये 'जल्लीकट्टू'सोबत आणखीही काही सिनेमे होते. ज्यात शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोंसले, गुलाबो सिताबो, सीरिअस मॅन, बुलबुल, कामयाब, द पिंक स्काय यांचा समावेश होता.
दरम्यान, धार्मिक भावना भडकावण्या प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही बहिणींना मुंबई पोलिसांनी आधी २६-२७ ऑक्टोबरला, ९-१० नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावर कंगनाच्या वकिलांनी सांगितले होते की, कंगना भावाच्या लग्नासाठी हिमाचलमध्ये आहे ती पोलिसांसमोर हजर राहू शकणार नाही. त्यानंतर मुंबई पोलिसांनी २३ आणि २४ नोव्हेंबरला तिसरा समन्स पाठवला होता.