Video : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:35 PM2020-06-15T17:35:09+5:302020-06-15T17:37:20+5:30
वाचा, काय म्हणाली कंगना
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसला आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सुशांतच्या निधनावर वेगवेगळ्या प्रकारे शोक व्यक्त करत आहेत. याचदरम्यान बॉलिवूडमध्ये आपल्या परखड बोलण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत हिने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर करण इंडस्ट्रीतील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत़ पण त्याला एकही मोठा अवार्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफियांची मुळं खोलवर रूजली आहेत. सुशांत त्याचाच बळी ठरला, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
काय म्हणाली कंगना
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने आपल्या सर्वांनाव धक्का बसला आहे. पण काहीजण जे लोक दुबळे असतात, ते डिप्रेशनमध्ये जातात व आत्महत्या करतात, असे बोलत आहेत. या लोकांना माझा एकच सवाल आहे, तो म्हणजे सुशांत इंजिनिअरिंगच्या परिक्षेत रँक होल्डर होता, तो दुबळा कसा असू शकतो? प्लीज माझे सिनेमे बघा, माझा कुणी गॉडफादर नाही, मला लोक इंडस्ट्रीतून काढून टाकतील, असे सुशांत त्याच्या पोस्टमध्ये म्हणतोय. यावरून काय समजायचे? गली बॉय सारख्या सुमार चित्रपटाला अवार्ड मिळतात आणि छिछोरे सारख्या उत्तम सिनेमाला एकही अवार्ड दिला जात नाही, याचा अर्थ काय? असा सवाल कंगनाने आपल्या व्हिडीओत केला आहे.
मीडियावरही तिने निशाणा साधला. मीडियात सुशांत सिंग राजपूत सायकोटिक आहे, न्युरोटिक आहे, असे लिहिले जाते. सुशांत त्यांना न्युरोटिक वाटतो आणि संजय दत्तची अॅडिक्शन त्यांना आवडते. लोक मला मॅसेज करतात की, तू कठीण परिस्थितीतून जात आहेत, भलते सलते काही करू नकोस. काय तुम्ही असे बोलून माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार पेरू इच्छिता? सुशांत सिंगची आत्महत्या नाही तर हा प्लान्ड मर्डर आहे,असे मी मानते. सुशांत काही लोकांच्या गोष्टींना बळी पडला. तुला काम नाही, त्याने मानले़ तुझे इथे काहीही होऊ शकत नाही, त्याने मानले. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत. छिछोरे एखाद्या स्टार किडने केला असता तर त्याला खूप मोठा स्टार बनवले गेले असते़. करण जोहर कॅम्पने कधीच त्याला कुठल्या पार्टीला बोलावले नाही. अनेकांनी तू बाहेरचा आहेस, याची सुशांतला सतत जाणीव करून दिली, असेही ती म्हणाली.