आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 10:35 AM2020-11-18T10:35:36+5:302020-11-18T10:38:50+5:30
बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. यानंतर शाकिबला धमक्या मिळू लागल्या होत्या.
बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. या घटनेची माहिती जाहीर झाल्यानंतर बांगलादेशमधील कट्टर अथवा कडव्या विचारांच्या मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली होती. शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून शाकिबने माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
क्यूँ डरते हो इतना मंदिरों से? कोई तो वजह होगी? यूँही कोई इतना नहीं घबराता, हम तो सारी उम्र मस्जिद में बिता दें फिर भी राम नाम कोई दिल से नहीं निकाल सकता, ख़ुद की इबादत पे भरोसा नहीं या अपना ही हिंदू अतीत तुम्हें मंदिरों से आकर्षित करता है? पूछो ख़ुद से.... https://t.co/on0cAWqnBI
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2020
कंगनाने एक न्यूज रीट्वीट करत या संपूर्ण प्रकरणावर कमेंट केली. ‘मंदिरांना इतके का घाबरता? काही तर कारण असेन, उगाच कोणी इतके घाबरत नाही. आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू पण आमच्या हृदयावर कोरलेले रामाचे नाव कोणी मिटवू शकत नाही. स्वत:च्या पूजेवर विश्वास नाही की, तुमचा भूतकाळ तुम्हाला मंदिरांकडे आकर्षित करत आहे. विचारा स्वत:ला... ’असे कंगना म्हणाली.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. मुद्दा कुठलाही असो. अगदी देशाच्या कोप-यात साधे खट् झाले तरी कंगनाची टिवटिव सुुरू होते. कंगनाची ही टिवटिव काही लोकांना आवडते तर काही लोकांचा यामुळे संताप होतो. अनेकजण तिला गप्प बसण्याचा सल्ला देतात.
शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या
गेल्या 16 नोव्हेंबरला शाकिब अल हसनने कोलकात्यात कालीचे दर्शन घेतले होते. यानंतर शाकिबला धमक्या मिळू लागल्या होत्या. मुस्लिम असून शाकिब अल हसन कालीमातेच्या दर्शनाला कसा जाऊ शकतो, असा प्रश्न काही मूलतत्ववाद्यांनी उपस्थित केला होता.यानंतर शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. बांगलादेशमधील मोहसिन तालुकदर याने फेसबुक लाइव्ह करत शाकिबचे तुकडे तुकडे करेन अशी धमकी दिली होती. फेसबुकने नंतर हा व्हिडीओ काढून टाकला होता पण तो पर्यंत वातावरण तापलेहोते. प्रकरण वाढत असल्याचे पाहून शाकिबने कोलकाता येथे कालीमातेच्या दर्शनासाठी गेल्याप्रकरणी माफी मागितली होती. मी पूजेच्या ठिकाणी फक्त दोन मिनिटे उपस्थित होतो. मान्यवरांच्या विनंतीचा मान राखत मी मेणबत्तीने दिप प्रज्वलन केले. पण पूजा केली नाही. एक सच्चा मुस्लिम म्हणून मी हे करायला नको होते. मी तिथे जाऊन चूक केली असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. कृपया मला माफ करा,अशा शब्दात शाकिब अल हसन याने क्षमायाचना केली होती.
... तर तुकडेतुकडे करू; बांगलादेशचा ऑल-राऊंडर शकिब अल हसनला जीवे मारण्याची धमकी
दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला...