थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री
By गीतांजली | Published: October 5, 2020 02:44 PM2020-10-05T14:44:55+5:302020-10-05T14:57:33+5:30
कंगना राणौतने 'थलायवी'च्या सेटवरच फोटो शेअर केले आहेत.
कंगना राणौतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती 'थलायवी'च्या शूटिंगसाठी साऊथला रवाना झाल्याचे सांगितले होते. आता तिने सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. कंगनाने फोटो शेअर करत लिहिले, गुड मॉर्निंग फ्रेंडस, हे काही फोटो काल (रविवार) सकाळचे टॅलेंडट दिग्दर्शक ए.एल विजयच्या सोबत चर्चे दरम्यानची आहेत. तसे तर जगात बरीच उत्तम आणि आरामदायक ठिकाणे आहेत, तरीही माझ्यासाठी 'थलायवी'चा सेट आहे.
Good morning friends, these are some stills from yesterday’s early morning scene discussion with my absolutely talented and most affectionate director A.L Vijay ji, there are many amazing places in this world but the most soothing and comforting to me is a film set #Thalaivipic.twitter.com/qGjw0nQjRQ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 5, 2020
अलीकडेच कंगनाने 'थलायवी' सिनेमासाठी करत असलेल्या डान्स रिहर्सलची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. कंगना रणौत आणि कोरिओग्राफरने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहूनही वाटतं की, कंगना पुन्हा काम सुरू केल्याने आनंदी आणि उत्सुक आहे.
Dear friends today is a very special day, resuming work after 7 months, travelling to southern India for my most ambitious bilingual project THALAIVI, need your blessings in these testing times of a pandemic.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 1, 2020
P.S just clicked these morning selfies hope you all like them ❤️ pic.twitter.com/drptQUzvXK
कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचे कळतेय. आधी हा सिनेमा २६ जून २०२० रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं.