या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:14 PM2020-07-21T15:14:06+5:302020-07-21T15:14:51+5:30
कालपरवा एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दोन व्यक्ति जाम चर्चेत आहेत. एक म्हणजे करण जोहर आणि दुसरी म्हणजे कंगना राणौत. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने नेपोटिजमचा मुद्दा उचलून धरला आणि तिच्या आरोपांनी बॉलिवूडमधील वातावरण तापले. कालपरवा एका मुलाखतीत तिने पुन्हा बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला. पण कंगनाने त्यालाही ‘मिनी महेश भट’ म्हणत शिंगावर घेतले.
काय म्हणाला अनुराग कश्यप..
Success और ताक़त का नशा हर किसीको बराबर बहकाता है , चाहे वो insider हो या outsider। “मुझसे सीखिए , मेरे जैसा बनिए”, यह बात मैंने २०१५ से पहले उसके मुँह से कभी नहीं सुनी। और तब से अब तक बात यहाँ आ पहुँची है कि जो मेरे साथ नहीं है वो सब मतलबी और चापलूस हैं।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
कंगनाची मुलाखत बघितल्यावर अनुरागने पहिले ट्वीट केले होते. ‘काल कंगनाची मुलाखत बिघतली. एकेकाळी माझी चांगली मैत्रिण होती. माझ्या प्रत्येक सिनेमानंतर मला हिंमत द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. आत्ता तिचा हा भयावह इंटरव्ह्यू सुद्धा बघितला. जो मणिकर्णिका रिलीज झाल्यानंतरचा आहे,’ असे या ट्वीटमध्ये त्याने लिहिले. यानंतर त्याने कंगनावर आणखी बरेच ट्वीट केलेत.
मैं बोलूँगा @KanganaTeam ।बहुत हो गया। और अगर यह तुम्हारे घर वालों को भी नहीं दिखता और तुम्हारे दोस्तों को भी नहीं दिखता तो फिर एक ही सच है की हर कोई तुम्हारा इस्तेमाल कर रहा है और तुम्हारा अपना आज कोई नहीं है । बाक़ी तुम्हारी मर्ज़ी, मुझे जो गाली बकनी है बको ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
‘इनसाईडर असो वा आऊटसाईडर यशाची आणि पैशांची हवा सगळ्यांच्या सारखीच डोक्यात जाते. माझ्यासारखे बना, माझ्याकडून शिका हे मी कंगनाच्या तोंडून कधीच ऐकले नाही. माझ्यासोबत जे नाहीत ते सगळे चमचे, मतलबी आहेत, एवढेच तिच्या तोंडून निघते,’ असे एका ट्वीटमध्ये तो म्हणाला. ‘जी आपल्या सर्व दिग्दर्शकांना शिव्या देते, एडिटमध्ये बसून आपल्या सहकलाकारांचे रोल कापते. आज जुने दिग्दर्शक तिच्यासोबत काम करताना दूर पळतात. दुस-यांना दाबण्याची हीच ताकद कंगनाने कमावलीय,’असेही एका ट्वीटमध्ये त्याने लिहिले.
‘मी बोलणार. आता खूप झाले. तुझ्या घरच्यांना दिसत नसेल, तुझ्या मित्रांना दिसत नसेलही पण एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे सगळे तुझा वापर करत आहेत. तुझे आज कोणी नाही. बाकी तुझी मर्जी. मला जितक्या शिव्या घालायच्या घाल,’ असे अन्य एका ट्वीटमध्ये त्याने म्हटले.
काय म्हणाली कंगना?
Here is mini Mahesh Bhatt telling Kangana she is all alone and surrounded by fake people who are using her, anti nationals, urban naxals the way they protect terrorists now protecting movie mafia 👏👏👏 https://t.co/PjP9JJ3Ymy
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 21, 2020
अनुरागचे हे ट्वीट पाहून कंगना भडकली नसेल तर नवल. मग काय, कंगनाच्या वतीने तिची टीम जणू पेटून उठली. ‘हा बघा मिनी महेश भट. जो कंगनाला एकटी व खोट्या लोकांनी वेढलेली असल्याचे म्हणतोय. हे लोक कंगनाचा वापर करत आहेत. अॅन्टी नॅशनल्स, अर्बन नक्शल्स जे अतिरेक्यांना वाचवतात. आता ते मुव्ही माफियांना पाठीशी घालत आहे,’ असे ट्वीट कंगनाच्या टीमने केले.