कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स...
By अमित इंगोले | Published: October 14, 2020 03:11 PM2020-10-14T15:11:56+5:302020-10-14T15:12:38+5:30
आता कंगनाने एक योगा करताना फोटो शेअर केलाय. ज्यात तिने सांगितले की, तिला थलाइवीसाठी तिला २० किलो वजन वाढवलं होतं.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबतच गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी सिनेमाच्या शूटींगला सुरूवा केली आहे. तिने तिच्या आगामी 'थलाइवी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. या सिनेमाच्या सेटवरील फोटोही समोर आला आहे. ज्यात कंगना जयललिता यांच्या गेटअपमध्ये दिसली होती. आता कंगनाने एक योगा करताना फोटो शेअर केलाय. ज्यात तिने सांगितले की, तिला थलाइवीसाठी तिला २० किलो वजन वाढवलं होतं. जे ती आता कमी करत आहे. या पोस्टवर ट्विटर यूजरच्या अनेक मजेदार कमेंट आल्या आहेत.
कंगनाने ट्विट करत लिहिले होते की, 'मी थलाइवी सिनेमासाठी २० किलो वजन वाढवलं होतं. आता सिनेमाचं शूटींग पूर्ण होणार आहे. तर मला आधीच्या साइजची, स्फुर्तीची, मेटाबॉलिज्म आणि फ्लेग्जिबिलिटीची गरज आहे. सकाळी उठून जॉगिंगला जात आहे. माझ्यासोबत कोण-कोण आहेत?'. (‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा)
I had gained 20kgs for Thalaivi, now that we are very close to completing it, need to go back to my earlier size, agility, metabolism and flexibility. Waking up early and going for a jog/walk .... who all are with me ? 🙂 pic.twitter.com/4HP6jSRGq5
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 14, 2020
कंगनाच्या या पोस्टवर ट्विटर यूजर्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काही लोकांनी तिचं कौतुक केलं तर काही लोकांना नकारात्मक कमेंट केल्या आहेत. याआधी कंगनाने आपल्या 'थलाइवी'चा नवा लूक शेअर केला होता. यात ती बरीचशी जयललिता यांच्यासारखी दिसत आहे. (कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; "गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे...")
याआधी 11 ऑक्टोबरला कंगनाने आपल्या ट्विटरवर थलायवीच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले होते.या फोटोंमध्ये कंगना तामिळनाडुच्या विधानसभेत बसलेली दाखवली आहे. कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (काय तर म्हणे, १६ व्या वर्षीच होते डिप्रेशनमध्ये, आमिर खानची लेक इरा खानवरही कंगणाने साधला निशाणा)
कंगनावर कर्नाटकात गुन्हा दाखल
मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलते. तिचे ट्विट अनेकदा वाद ओढवून घेतात. सध्या अशाच एका ट्विटमुळे कंगना गोत्यात आली आहे. तिच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
21 सप्टेंबरला कंगनाने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कंगनाने कृषी विधेयकाचा विरोध करणा-या शेतक-यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. याच वादग्रस्त ट्विटप्रकरणी कर्नाटकच्या तुमकुरूच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तुमकूर जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला गेला. कंगनावर आयपीसी कलम 108, 153अ आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.