कसाबचीही एवढी ट्रायल झाली नसेल, रियाच्या समर्थनार्थ स्वराचा तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:55 PM2020-08-27T12:55:32+5:302020-08-27T12:58:54+5:30
सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
मुंबई - सुशांत सिंह राजपूत केस सीबीआयच्या ताब्यात गेल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण रिया चक्रवर्तीने मीडियासमोर आतापर्यंत काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. ती आता मीडियासमोर आली आहे. या केसमध्ये चारही बाजूंनी वेढल्या गेलेल्या रियाने आता एका वेबसाइटला मुलाखत दिली आहे. आतापर्यंत गप्प बसलेली रिया आता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, माध्यमांकडून सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी सुरू असलेल्या बातम्यांवरुन अभिनेत्री स्वरा भास्करने नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. इतकेदिवस मीडियापासून दूर राहणारी रिया आता मीडियासमोर येऊन बाजू मांडत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तिने तिच्या एका चुकीबाबत सांगितले. ती म्हणाली की, तिने एक चूक केली होती. ती म्हणजे सुशांत सिंह राजपूतवर प्रेम केलं. ती म्हणाली की, याने काहीही फरक पडत नाही की, कोणती एजन्सी तपास करत आहे आणि कोण चौकशी करत आहे. पण तिच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. मात्र, रियाच्या मीडिया ट्रायलवरुन स्वरा भास्करने माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे.
मीडियाने कसाबचीदेखील एवढी मीडिया ट्रायल घेतली नसेल, जेवढी रियाची घेतली जातेय, असे म्हणत स्वराने मीडियाने याप्रकरणात दाखवलेल्या वृत्तांकनावर संताप व्यक्त केला आहे. मला नाही वाटत की कसाब हा देखील मीडियावर 'Witch hunt' चा एवढा मोठा विषय राहला होता. ज्याप्रकारे रिया चक्रवर्ती मीडिया ट्रायल सहन करत आहे, लाज वाटली पाहिजे भारतीय मीडियाला... या विषारी हिस्ट्रीरियाला सहन करणारी टॉकसिक जनतेचीही मला लाज वाटते, असे स्वराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिले आहे.
I don’t think even #Kasab was subjected to the kind of witch-hunt on media.. & media trial that #RheaChakrobarty is being subjected to! Shame on Indian Media.. Shame on us for being a toxic voyueristic public consuming this poisonous hysteria.. #RheaDrugChat#SushantSinghRajput
— Swara Bhasker (@ReallySwara) August 26, 2020
स्वराने यापूर्वीही रिया चक्रवर्तीच्या मीडिया ट्रायलवर लिहिले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी स्वराने मीडियावर निशाणा साधला होता. रिया एक अजब-गजब आणि खरतनाक मीडिया ट्रायलचा शिकार बनली आहे. एक गर्दी याचं नेतृत्व करत आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी लक्ष देईल आणि खोट्या बातम्यांचे प्रसारण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे ट्विट स्वराने केल होते.
सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती
आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.
खूप खर्चाबाबत सुशांतला टोकले होते
रियाने सांगितले की, 'पॅरिसमध्ये माझं एक शूट होणार होतं. यासाठी इव्हेंट ऑर्गनाइज कंपनीकडून फ्लाइटची तिकीटे आणि हॉटेलचं बुकींग झालेलं होतं. पण ही सुशांतचीच आयडिया होती की, या निमित्ताने यूरोपची ट्रिप करूया. सुशांतने नंतर माझे तिकीट्स कॅन्सल केले आणि स्वत:च्या पैशाने फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलं होतं. मी त्याला म्हणाले होते की, तू फार जास्त पैसे खर्च करतोय'.