VIDEO : सलमानने शूटींगदरम्यान केलं असं काही की कतरिनाने दाबला त्याचा गळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 15:19 IST2020-10-06T15:18:16+5:302020-10-06T15:19:23+5:30
सलमान खान आणि कतरिना कैफच्या या व्हिडीओत बघायला मिळतं की, माशाअल्लाह गाण्याच्या शूटींगवेळी पहिल्या शॉटमध्ये सलमान त्याच्या स्कार्फने हैराण होतो आणि शॉटच्या मधेच तो बाजूला जातो.

VIDEO : सलमानने शूटींगदरम्यान केलं असं काही की कतरिनाने दाबला त्याचा गळा!
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघे अनेक सिनेमांमध्ये एकत्र बघितले गेले. इतकेच नाही तर दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप पसंत पडते. अशात सलमान खान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात कतरिना सलमान खानचा गळा दाबताना दिसली आहे. त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या फॅनपेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. आतापर्यंतत १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.
सलमान खान आणि कतरिना कैफच्या या व्हिडीओत बघायला मिळतं की, माशाअल्लाह गाण्याच्या शूटींगवेळी पहिल्या शॉटमध्ये सलमान त्याच्या स्कार्फने हैराण होतो आणि शॉटच्या मधेच तो बाजूला जातो. तेच दुसऱ्या शॉटमध्ये कतरिना शॉट पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते तेव्हा सलमानला हसू येतं. याने कतरिना गंमतीने सलमान खानचा गळा दाबते. लोकांना हा व्हिडीओ चांगलंच आवडला असून दोघांचं भरभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, सलमान खान आणि कतरिया कैफचा हा व्हिडीओ 'एक था टायगर'मधील माशाअल्लाह गाण्याच्या शूटींगचा आहे. दोघेही शेवटचे भारत सिनेमात दिसले होते. या सिनेमातही दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आता सलमान लवकरच राधे सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत दिशा पटानी आणि रणदीप हु्ड्डाही दिसणार आहे. तर दुसरीकडे कतरिना कैफ अक्षय कुमारच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे.