#VicKat: विकी-कतरिनाचा शाही थाट! जेवणाच्या मेन्यूसाठी थायलंडवरुन मागवल्या भाज्या; पाहा जेवणात आहेत कोणते पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:24 PM2021-12-07T12:24:27+5:302021-12-07T12:25:04+5:30
#VicKat:येत्या ९ डिसेंबर रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर त्यांचा लग्नसोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे.
'चिकनी चमेली', बार्बी डॉल अशा असंख्य नावाने ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच कौशल कुटुंबाची सूनबाई होणार आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर त्यांचा लग्नसोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे. विशेष म्हणजे या लग्नासोहळ्याकडे प्रत्येकाचं लक्ष वेधलं आहे. त्यातच या लग्नाविषयी अनेक अपडेट्स सोशल मीडियावर येत आहेत. यामध्येच आता विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची खास व्यवस्था केल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर पाहुण्यांना जेवणात चक्क विदेशातील भाज्यांची चव चाखता येणार आहे.
विकी- कतरिना खास राजस्थानमधील माधोपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. सोमवारी ही जोडी राजस्थानमध्ये पोहोचली असून आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात पाहुण्यांची विशेष खातिरदारी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी विदेशातून भाज्या मागवण्यासाठी स्पेशल गेस्टसाठी स्वतंत्र डिनर सेट, सिटींग अरेंजमेंट केल्याचं सांगण्यात येत आहे.
VIP अतिथींसाठी खास व्यवस्था
विकी-कतरिनाच्या लग्नासाठी VIP गेस्टसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. यामध्येच या पाहुण्यांसाठी मुंबईवरून ४ डझन क्रॉकरी सेट मागवण्यात आले आहेत. तर, अन्य पाहुण्यांसाठी ३०० क्रॉकरी सेटची ऑर्डर दिली आहे.
थायलंडवरुन मागवल्या भाज्या
विकी -कतरिनाच्या लग्नाचा राजेशाही थाट असल्याचं पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्यात देशासह विदेशातून काही गोष्टी मागवण्यात आल्या आहेत. यात थायलंडवरुन काही भाज्यांचे प्रकार मागवले आहेत. तर, कर्नाटकातून केळी आणि मशरुम्स मागवले आहेत.
जेवणात असेल हा खास मेन्यू
विकी-कतरिनाच्या लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. यात पारंपरिक पदार्थांपासून ते पाश्चात्य पदार्थांनाही स्थान मिळणार आहे. तसंच खास राजस्थानी व पंजाबी काँटिनेंटल फूडदेखील असणार आहे.
दरम्यान, माधोपूरा येथील Six Senses Fort Barwara येथे विकी-कतरिना लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाची संपूर्ण जबाबदारी हॉटेल मॅनेजमेंट आणि इव्हेंट कंपनीला देण्यात आली आहे.