कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 11:15 PM2020-09-22T23:15:31+5:302020-09-22T23:19:54+5:30

सोशल मीडियावर अनेकांकडून संताप व्यक्त; कामगार मंत्रालयाकडून फोटो डिलीट

labour ministry retweets photo shopped pic of deepika padukone smoking amid drug scandal | कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

googlenewsNext

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयचे हात रिकामे असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) कारवाई मात्र जोरात सुरू आहे. अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती सुशांतसाठी ड्रग्ज मागवायची याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीनं मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावं पुढे आली. या प्रकरणात आता अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नावंही चर्चेत आलं आहे. त्यातच मोदी सरकारच्या कामगार मंत्रालयानं दीपिकाचा एक एडिट करण्यात आलेला फोटो रिट्विट केला. मात्र अवघ्या काही वेळातच तो फोटो मंत्रालयानं डिलीट केला.

कामगार मंत्रालयानं दीपिकाचा एडिट केलेला फोटो रिट्विट केल्यानंतर अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉट्स काढले. त्यामुळे मंत्रालयानं फोटो डिलीट करूनही फारसा उपयोग झालेला नाही. यावरून अनेकांनी कामगार मंत्रालयावर टीकेची झोड उठवली. 'लॉकडाऊनच्या काळात किती स्थलांतरितांचा मृत्यू झाला, याची सरकारकडे नोंद नाही. मात्र सरकारच्या मंत्रालयांना ट्रोलिंग करण्यासाठी वेळ आहे,' अशा शब्दांत एका ट्विटर वापरकर्त्यानं कामगार मंत्रालयाच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला.





कामगार मंत्रालय एका महिलेचा एडिट केलेला फोटो वापरून ट्रोल करतंय. बहुधा यालाच लोकशाही म्हणतात. यापेक्षा वाईट सरकार/देश/नागरिक पाहिलेले नाहीत, अशा काही प्रतिक्रिया ट्विटरवर वाचायला मिळत आहेत. ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचं नाव आल्यानं एनसीबी तिला समन्स बजावण्याची शक्यता आहे. ड्रग्जबद्दलचा संवाद असणारे काही चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामध्ये दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आण 'डी'मध्ये संवाद सुरू असल्याची माहिती एनसीबीमधील सुत्रांनी दिली आहे.





या आठवड्यात ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अभिनेत्री राकुल प्रित सिंग आणि सारा अली खान आणि डिझायनर सिमॉन खंबाटा यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया शहाची आज एनसीबीनं चौकशी केली. एनसीबीनं आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकचा समावेश आहे.

Web Title: labour ministry retweets photo shopped pic of deepika padukone smoking amid drug scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.