सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:30 PM2020-10-09T15:30:47+5:302020-10-09T15:32:52+5:30
'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल.
नेहमीच दाक्षिणात्य सिनेमांच्या विषयातील जादू आणि दमदार कथानक तसंच तितक्याच ताकदीचे दिग्दर्शन यामुळे हिंदी कलाकारांना दाक्षिणात्या सिनेमांची भुरळ पडते. आजवर अनेक सिनेमांचे हिंदी रिमेक बनवण्यात आले आहेत. त्यापैकीच कंचना सिनेमा हा सुपरहिट ठरला. त्याच्या लोकप्रियतेमुळे या सिनेमाचे 'कंचना २' आणि 'कंचना ३' असे भागही प्रदर्शित करण्यात आले. सिनेमाचे तिन्ही सुपरहिट ठरले.
From Lakshmi bomb song shoot, I’m happy and proud to be working with the most hardworking , time punctual and down to earth Akshay Kumar sir and beyond all that a good human being. pic.twitter.com/LQMkmR00RW
— Raghava Lawrence (@offl_Lawrence) February 11, 2020
सिनेमात राघव लॉरेन्सनेच मुख्य भुमिका साकारली होती. या सिनेमात अभिनयासह दिग्दर्शनही त्यानेच केले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही भरघोस कमाई केली होती. या सिनेमानं बॉलीवुडवरही मोहिनी घातली. त्यामुळे हिंदीतही लक्ष्मी बॉम्ब नावाने हा सिनेमा बनवण्यात आला आहे. अक्षय कुमार सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे.
नुकताच सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. कंचना सिनेमात राघवने साकारलेली भूमिका आणि लक्ष्मी बॉम्बमध्ये अक्षयने साकारलेल्या भूमिकेविषयी नेटीझन्स तुलना करताना दिसतायेत. कंचना सिनेमात राघवने भूमिकेसाठी खूप मेहनतही घेतली होती. त्यामुळे त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!
बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर आज रिलीज झाला. एकीकडे हा ट्रेलर पाहून चाहते पुन्हा एकदा अक्कीच्या प्रेमात पडले आहेत. काही लोकांना मात्र ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलरने नाराज केले आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी अक्षयला ‘डरपोक’ म्हणत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. अक्षय व चित्रपटाचा दिग्दर्शक दोघेही ट्रोल होत आहेत.ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी अक्षयला ‘डरपोक’ म्हणत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. अक्षय व चित्रपटाचा दिग्दर्शक दोघेही ट्रोल होत आहेत.
भारत सोडून 'या' देशांमधील सिनेमागृहात 'लक्ष्मी बॉम्ब' होणार रिलीज अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब'
भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत. अक्षय कुमार या सिनेमातून पहिल्यांदाच एका किन्नरची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे. कोरोना काळात सोशल मीडियातून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.