'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 12:00 PM2020-07-25T12:00:59+5:302020-07-25T12:02:01+5:30

'दिल बेचारा' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा होती. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच  3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते.

Last night after the launch of Dil Bechara Hotstar Crashed | 'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड

'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड

googlenewsNext

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे अनेक मोठे चित्रपट आता ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' अखेर प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होताच रसिकांच्या प्रतिक्रीयाही सोशल मीडियावर उमटू लागल्या होत्या. सिनेमा पाहिल्यांनतर रसिकांनी भावूक पोस्ट शेअर करत सुशांतच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर संध्याकाळी 7 वाजेपासून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला आणि  त्यानंतर अवघ्या दोन तासातच हॉटस्टार क्रॅश झाले होते. हॉटस्टार क्रॅश  झाल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला होता. त्यांनतर काही वेळातच पुन्हा हॉटस्टार सुरू झाले आहे.

सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा होती. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच  3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते. विशेष म्हणजे या सिनेमाने हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमच्या ट्रेलरचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.  एवेंजर्स: इंफिनिटी वॉरला 3.6 मिलियन लाईक्स मिळाले होते. याच सोबत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक पसंतीचा 'दिल बेचारा' सिनेमाचा ट्रेलर ठरला होता.

दिल बेचारा मॅनी आणि किझी या दोन किशोरवयीन मुलांची प्रेमकथा आहे, ज्यांच्या आयुष्यात काही घटना घडून गेल्या आहेत, मात्र तरीही त्यांना आयुष्य जगण्याची इच्छा आहे. एकमेकांना भेटून दोघांना पुन्हा एकदा जगण्याचे कारण मिळते. सिनेमात सुशांत सिंह राजपूत (मॅनी), संजना सांघी (किजी बासू), सैफ अली खान (आफताब खान), साहिल वैद्य, जावेद जाफरी, मिलिंद गुणाजी, स्वस्तिका मुखर्जी यांच्या भूमिका आहेत.

Web Title: Last night after the launch of Dil Bechara Hotstar Crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.