विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:00 AM2020-08-21T08:00:00+5:302020-08-21T08:00:00+5:30
विद्युतच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनिंग देणारा 'खुदा हाफिज' चित्रपट ठरला आहे.
अभिनेता विद्युत जामवालचा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर खुदा हाफिज चित्रपट प्रदर्शित झाला. विद्युतच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. विद्युतने त्याच्या या यशाचे श्रेय चाहत्यांना दिले आहे. खुदा हाफिजचे दिग्दर्शन फारूख कबीरने केले आहे. या चित्रपटात विद्युतसोबत मुख्य भूमिकेत शिवलिका ऑबेरॉय, अन्नू कपूर आणि आहाना कुमरा आहेत.
चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल विद्युत जामवाल म्हणाला की, माझ्या चित्रपटासाठी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील माझे चाहते आणि समीक्षकांचा मी आभारी आहे. हे यश तुमच्या सपोर्ट आणि प्रशंसेशिवाय मिळू शकले नसते. त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन.
विद्युत पुढे म्हणाला की, या चित्रपटातील समीरची भूमिका साकारणे खूप चॅलेजिंग होते. तसेच या भूमिकेने खूप काही शिकविले. या भूमिकेतून माझी प्रतिभा सुधारण्यासाठी चांगली संधी मिळाली.
खुदा हाफिज चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात समीर चौधरी आणि नरगिस या विवाहित जोडप्याची कथा रेखाटण्यात आली आहे. देशात बेरोजगारी येते. त्यानंतर त्याची पत्नी बाहेर गावी नोकरीसाठी गेली आणि तिथे पोहचल्यापासून तिचा थांगपत्ता लागत नव्हता. मग, तिला शोधण्यासाठी नवऱ्याने केलेला खडतर प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे.