संजूबाबा कॅन्सरमुक्त झाल्याचे ऐकून ढसाढसा रडली पत्नी मान्यता, मित्राने केला खुलासा
By रूपाली मुधोळकर | Published: October 22, 2020 05:18 PM2020-10-22T17:18:50+5:302020-10-22T17:20:19+5:30
म्हणे, ती एक समर्पित पत्नी व आई...
संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान होताच कुटुंबासोबतच चाहतेही बाबाच्या काळजीने चिंतीत होते. पण बाबाची इच्छाशक्ती जबरदस्त होती. मी कॅन्सरला हरवणारच, हा इरादा पक्का होता. त्यानुसार, संजूबाबाने कॅन्सरला मात दिली. काल 21 आॅक्टोबरला मुलांच्या वाढदिवशी कॅन्सरमुक्त झाल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांशी शेअर केली. या बातमीने चाहते सुखावले. कुटुंबात आनंद व समाधानाचे वातावरण पसरले. संजूबाबाची पत्नी मान्यता तर ही बातमी ऐकून ढसाढसा रडू लागली.
संजयच्या एका जवळच्या मित्राने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले, ‘कॅन्सरमुक्त झाल्याची बातमी संजूने सर्वप्रथम मान्यताला दिली. मान्यता ती बातमी ऐकून ढसाढसा रडू लागली. संजय बरा व्हावा, या आजारपणातून बाहेर पडावा म्हणून मान्यता दिवसरात्र देवाला प्रार्निा करत होती. देवाने तिची प्रार्थना ऐकली. त्यामुळेच ती अश्रू रोखू शकली नाही. आनंदाने तिचा बांध फुटला.’
मान्यताने प्रत्येक कठीण प्रसंगात संजयला खंबीर साथ दिली आहे. संजूला कॅन्सर झाल्याचे कळताच ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. संजयने मान्यताशी लग्न केले तेव्हा हे लग्न कितीदिवस टिकेल, याबाबत सगळेच साशंक होते. पण मान्यताने ती एक समर्पित पत्नी व आई आहे, हे सिद्ध केले, असेही हा मित्र म्हणाला.
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर करत कॅन्सरला मात दिल्याची बातमी दिली होती. ‘आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना मला अतिशय आनंद होतोय. गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना, देव सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आज माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी आज त्यांना सर्वात मोठे गिफ्ट देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. हे सर्व तुमच्या विश्वासामुळे आणि पाठींब्याशिवाय शक्य नव्हते. तुमच्या प्रार्थनांमुळे मी या आजारावर मात करू शकलो. मला इतके प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार’, असे संजयने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले होते.
यावर्षी ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. 2008 मध्ये संजय व मान्यताने लग्न केले. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची होती तर संजय 50 वर्षांचा. 2010 मध्ये मान्यताने शरान व इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला.
कॅन्सरला मात दिल्यानंतर समोर आला संजय दत्तचा पहिला फोटो, कोकिलाबेन हॉस्पिटलमधून परतला घरी
शेर है तू शेर! संजय दत्तने कॅन्सरला दिली मात, आयुष्याची लढाई जिंकत फॅन्सना म्हणाला...