Netflix वरील एका शोमध्ये माधुरी दीक्षितचा अवमानकारक उल्लेख, चाहत्याने पाठवली कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:18 AM2023-03-28T09:18:31+5:302023-03-28T09:28:14+5:30

या शोच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात तुलना केली आहे.

madhuri dixit referred as prostitute in big bang theory netflix show fan send legal notice | Netflix वरील एका शोमध्ये माधुरी दीक्षितचा अवमानकारक उल्लेख, चाहत्याने पाठवली कायदेशीर नोटीस

Netflix वरील एका शोमध्ये माधुरी दीक्षितचा अवमानकारक उल्लेख, चाहत्याने पाठवली कायदेशीर नोटीस

googlenewsNext

नेटफ्लिक्सवरील (Netflix) लोकप्रिय अमेरिकन कॉमेडी शो 'द बिग बँग थिअरी' (Big Bang Theory) मध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवण्यात आली आहे.  मिथून विजय कुमार या व्यक्तीने ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात तुलना केली आहे. दरम्यान यामध्ये माधुरीचा उल्लेख 'प्रॉस्टि्यूट'(Prostitute) असा करण्यात आला आहे.

'द बिग बँग थिअरी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये एक सीन आहे. यामध्ये राज आणि शेल्डन हे दोन पात्र टीव्ही बघत असतात. त्यात एका अभिनेत्रीला बघून शेल्डन विचारतो 'ही महिला ऐश्वर्या रॉय आहे.'  यावर राज म्हणतो, 'हो किती कमाल अभिनेत्री आहे.' शेल्डन असहमती दाखवत म्हणतो, 'मला वाटतं की ही गरिबांची माधुरी दीक्षित आहे.'  यामुळे राज भडकतो आणि म्हणतो, 'तुझी हिंमत कशी झाली. ऐश्वर्या देवी आहे. तिच्या तुलनेत माधुरी लेपरस प्रॉस्टिट्यूट आहे.'

लेपरस प्रॉस्टिट्यूटचा (Leperous Prostitute) अर्थ होतो 'कोड असलेली वेश्या'. एखाद्याला अशा भाषेत हिणवणे नक्कीच अपमानजनक आहे. पण अमेरिकेत अशी भाषा वापरणं खूपच सामान्य आहे. त्याचं शब्दश: अनुवाद केला तर अर्थाचा अनर्थच होणार. मात्र तरी असा शब्द वापरणं योग्य नाहीच हेही तितकंच खरं आहे. 

नोटिसीमध्ये काय लिहिले ?

'द बिग बँग थिअरी' हा केवळ नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणून मिथून विजय कुमारने नेटफ्लिक्सला नोटीस पाठवत हा एपिसोड काढून टाकण्याची मागणी केली. नोटीसमध्ये त्यांनी म्हटले,'नेटफ्लिक्ससारख्या कंपनीला यावर उत्तर द्यावं लागेल. सांस्कृतिक मूल्यांप्रती आणि भावनांप्रती त्यांनी संवेदनशील असले पाहिजे. स्ट्रीमिंग कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आणि अपमानजनक काही असेल तर ते वेळीच काढलं पाहिजे. मी नेटफ्लिक्सवरील बिग बँग थिअरी शो मुळे निराश झालो आहे. माधुरी दीक्षितप्रती दाखवण्यात आलेला शब्द अपमानजनक आणि प्रतिमेला ठेच पोहोचवणारा आहे.'

मिथून विजय कुमार यांनी ही नोटीस ट्वीटही केली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, 'लहानपणापासून मी माधुरी दीक्षितचा चाहता आहे. माधुरीबद्दल वापरण्यात आलेला डायलॉग अपमानजनक आहे. म्हणून मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला नोटीस पाठवत एपिोड हटवण्याची मागणी केली आहे. 

आता यावर नेटफ्लिक्सकडून काय प्रतिक्रिया येते, एपिसोड हटवला जातो का हे बघणं महत्वाचं आहे.

Web Title: madhuri dixit referred as prostitute in big bang theory netflix show fan send legal notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.