OMG! महेश बाबूचा असा दणक्यात साजरा झाला वाढदिवस की विश्वविक्रम रचला गेला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:52 AM2020-08-10T11:52:47+5:302020-08-10T11:57:20+5:30
शुभेच्छा आणि नुसत्या शुभेच्छा...!!
काल 9 ऑगस्टला साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. कोरोना काळात वाढदिवस दणक्यात कसा साजरा होऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झाला, अर्थात प्रत्यक्ष नाही तर सोशल मीडियावर. होय, चाहत्यांनी आपल्या या लाडक्या सुपरस्टार्सवर शुभेच्छांचा असा काही वर्षाव केला की, एक विश्वविक्रम रचला गेला.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर या विश्वविक्रमाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महेश बाबूने चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी कुठलाही सामूहिक कार्य्रकम आयोजित न करण्याचे आवाहन केले होते. चाहत्यांनी या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि प्रत्यक्ष वाढदिवस साजरा न करता सोशल मीडियावर महेशबाबूचा वाढदिवस साजरा केला. मग काय, ट्विटरवर #HBDMaheshBabu हा टॅग ट्रेंड करू लागला.
या टॅगचा वापर करत, सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा जणू पाऊस पडला. महेश बाबूला शुभेच्छा देण्यासाठी सुमारे 60.2 मिलियन (सुमारे 6 कोटी) ट्विट्स केले गेलेत आणि एक विक्रम रचला गेला. महेशबाबू जगात सर्वाधिक वेगाने 60.2 मिनियन बर्थ डे ट्विट्स प्राप्त करणारा सेलिब्रिटी बनला.
महेशबाबूचा जन्म 9 ऑगस्ट1975 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. साऊथचे सुपरस्टार कृष्णा यांचा महेश बाबू हा मुलगा. चाहते महेशबाबूला प्रिंस स्टार म्हणून ओळखतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे महेश बाबू.
महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणा-्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महेश बाबू एका सिनेमासाठी 20 ते 25 कोटींचे मानधन घेतो.