हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...
By अमित इंगोले | Published: October 2, 2020 12:24 PM2020-10-02T12:24:34+5:302020-10-02T12:26:13+5:30
एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअॅक्शन दिलीय. हैद्राबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं.
(Image Credit : theweek.in)
अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊन काळात रिअल हिरो ठरला आहे. त्याने प्रवासी मजुरांची करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या कामाबाबत त्याचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जातंय. अनेकांसाठी तो देवदूत ठरला. अशात एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअॅक्शन दिलीय.
हैदराबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं. ट्विटर यूजरने लिहिले की, 'हैदराबाद, बेगमपेटच्या अनिल कुमारला भेटा. त्यांनी दुकानाचं चायनीज नाव हटवून सोनू सूद सरांचं नाव आणि फोटो लावलाय. त्यांनी मला सांगितले की, मी कधी देव पाहिला नाही. एक खरा देव पाहिला तो आहे सोनू सूद'. यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले की, 'काय मला इथे ट्रीट मिळेल?'.
Will I get a treat there?❤️😜 https://t.co/Q3XVrMNWfN
— sonu sood (@SonuSood) September 30, 2020
दरम्यान, सोनू सूदच्या कामाची दखल यूएनने सुद्धा घेतली. त्याला नुकतेच यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून एसडीजी स्पेशल ह्युमॅनिटेरियन अॅक्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २९ सप्टेंबरला एका व्हर्चुअल सेरेमनीमध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला. याबाबत सोनू सूद म्हणाला की, हा एक मोठा सन्मान आहे. यूएनकडून सन्मान मिळणं खास आहे.
चिमुकल्यांना जीवदान देणार
दरम्यान, इलाज इंडिया मोहिमेच्या माध्यमातून देशातील लहानग्यांना जीवदान देण्यासाठी सोनू पुढे आला आहे. सोनूने अनेकांना मदत केली आहे. कित्येकांना मोफत उपचार करत जीवदान दिले आहे. सोनूचे हे काम आता एक चळवळ बनत आहे. त्यातूनच सोनूने इलाज इंडिया नावाने नवीन मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या लहानग्यांच्या हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूद घेणार आहे.
मेरी एक नई कोशिश।
— sonu sood (@SonuSood) September 24, 2020
अब बच्चों की हार्ट सर्जरी के लिए मेरा सहयोग। ❤️🙏 pic.twitter.com/1Ti9gOakXi
पीडियाट्र्रीक हार्ट सर्जरीसाठी इलाज इंडिया नावाने नवीन काम हाती घेतलं आहे. देशातील गरजूंना या सुविधेचा लाभ सरजरित्या मिळावा, यासाठी सोनूने टोल फ्री नंबरही जारी केला आहे. या सेवा योजनेला सोनूने इलाज इंडिया... समर्थ भारत, स्वस्थ भारत हे नाव दिले आहे. या महिन्यातील हे सोनूने लाँच केलेले तिसरे महत्त्वाचे काम ठरले आहे. यापूर्वी सोनूने आई सरोज सूद यांच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, तीन दिवसांपूर्वीच सोनूने स्कॉलिफाई नावाने अॅप लाँच केले असून त्याद्वारे युजर्संना 100 पेक्षा जास्त स्कॉलरशीप जिंकता येणार आहेत. आता, ह्रदयरोगाशी संबंधित हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूदने घेतली आहे.
सोनूने ह्रदयरोगाशी संबंधित पीडियाट्रीक हार्ट सर्जरीसाठी गरजवंतांना पुढील टोल क्रमांक - 02067083686 शेअर केला असून याद्वारे आपणास मदत मिळणार आहे. या कामी रोटरीची मदत सोनूला होणार आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन या नव्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.