#MeToo: दिया मिर्झा म्हणते, साजिद खान हा अतिशय सेक्सिस्ट आणि वात्रट माणूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 10:51 IST2018-10-16T10:50:16+5:302018-10-16T10:51:04+5:30
साजिदच्याच ‘बेबी’ या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसलेली अभिनेत्री दिया मिर्झा हिने साजिदबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे.

#MeToo: दिया मिर्झा म्हणते, साजिद खान हा अतिशय सेक्सिस्ट आणि वात्रट माणूस
दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे साजिदला ‘हाऊसफुल 4’ही हातचा गमवावा लागला. आता साजिदच्याच ‘बेबी’ या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसलेली अभिनेत्री दिया मिर्झा हिने साजिदबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. साजिद खान एक अतिशय घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. अतिशय सेक्सिस्ट आणि वात्रट माणूस. त्याच्याबद्दलच्या मीटू स्टोरीज धक्कादायकचं आहेत. पण तो कसा आहे, मी हे चांगलेच ओळखून आहे. मी कायम अशा लोकांना ओळखत आले आहे आणि वेळीच त्यांच्यापासून दूरही झाली आहे, असे दिया मिर्झा म्हणाली.
स्वत:चा इंडस्ट्रीतील अनुभवही तिने शेअर केला. सुदैवाने मी लैंगिक शोषणाला बळी पडले नाही. पण मला चिड आणणाºया अशा गोष्टी जरूर घडल्या़ अनेकांच्या वाईट भावना ओळखून मी त्यांचा फटकारून लावले. यामुळे मी अनेकांचा रोषही पत्करला, असेही दिया म्हणाली.
साजिदवर अभिनेत्री सलोनी चोप्राने गंभीर आरोप केलेत. यानंतर ‘उंगली’ या चित्रपटाच्या अभिनेत्रीने, एका महिला पत्रकाराने शिवाय अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिदवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवलेत. या पार्श्वभूमीवर साजिदची बहीण फराह खान आणि चुलत भाऊ फरहान अख्तर यांनीही साजिदने चूक केली असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे म्हटले आहे.