Nawazuddin siddiqui : आई-पत्नी भांडतात, नवाजुद्दीन सिद्धीकीवर हॉटेलमध्ये राहण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:38 PM2023-02-06T12:38:56+5:302023-02-06T12:42:00+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याचा आलिशान बंगलासोडून हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती त्याच्या मित्राने दिलीय.
Nawazuddin Siddiqui:गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. आलियाच्या सासू-सासऱ्यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली होती. रिपोर्टनुसार हा संपूर्ण वाद संपत्तीवरून सुरू आहे. नवाजची पत्नी आलियाने अभिनेता आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मुंबईच्या अंधेरी कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. रिपोर्टनुसार पत्नी आणि आईमधील वाद मिटत नाही तोपर्यंत नवाजुद्दीन हॉटेलमध्ये शिफ्ट झाल्याचं समोर आलं आहे. त्याने आपला आलिशान बंगला सोडून हॉटेलमध्ये रात्र काढावी लागत आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मित्राने सांगितले की, जोपर्यंत त्याचे वकील त्याच्या घरातील 'नवाब'मधील कायदेशीर समस्यांचे निराकरण करत नाहीत तोपर्यंत अभिनेता हॉटेलमध्येच राहणार आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची पत्नी आणि आई यांच्यात मालमत्तेबाबतचा वाद समोर आला होता, ज्यामध्ये त्याची आई मेहरुनिसा यांनी सून आलियाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर तक्रारीवरून पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. नवाजच्या आईने असा दावा केला आहे की आलिया ही अभिनेत्याची पत्नी देखील नाही.
दुसरीकडे, आलियानेही कायदेशीर मार्ग स्वीकारत नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला जेवण आणि मूलभूत सुविधा, अगदी बाथरूममध्येही जाऊ दिले नाही, असा आरोप केला. या वादाबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई कोर्टाने अभिनेत्याला नोटीस पाठवली आहे.
आलियाच्या वकिलाने सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील कोणीही आलियाला 7 दिवस जेवण दिले नव्हते. तिला झोपण्यासाठी बेडही दिला नाही. आलियाला आंघोळीसाठी बाथरूममध्येही जाण्याची परवानगी नाही. एवढेच नाही तर आलियाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. त्याच्या खोलीबाहेर बॉडीगार्ड २४ तास तैनात असतात.
नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत त्याचे ड्रीम हाउस बनवले होते. या घराचे इंटीरियर डिझाइनही त्यानेच केले होते. हा आलिशान बंगला तयार व्हायला तीन वर्षे लागली. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी या आलिशान घराला 'नवाब' असे नाव दिले आहे.